करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर तब्बल ८ महिन्यांच्या कालावधीने पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेच्या प्ले-ऑफ सामन्यांना सुरुवात झाली आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एलिमीनेटर सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफ चर्चेचा विषय ठरला होता. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी लाहोर आणि मुलतान हे संघ रविवारी कराचीच्या मैदानात समोरासमोर आले.

लाहोर संघाकडून खेळताना आफ्रिकेच्या डेव्हिड वाईजने २१ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. यानंतर गोलंदाजीतही त्याने ३ बळी घेत आपलं महत्वाचं योगदान दिलं. वाईजच्या सोबतीने लाहोरकडून हारिस रौफनेही ३ बळी घेत मुलतानच्या संघाला खिंडार पाडलं. मुलतानच्या संघाकडून खेळणारा पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीचा हारिस रौफने भन्नाट इनस्विंगवर त्रिफळा उडवला….यानंतर हारिसने आफ्रिदीसारख्या मोठ्या खेळाडूला बाद करत त्याची हात जोडून माफीही मागितली. पाहा हा व्हिडीओ…

यानंतर हारिसने आपण शाहीद आफ्रिदीची माफी का मागितली याचं कारणही सांगितलं.

दरम्यान लाहोरने मुलतानवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश निश्चीत केला आहे. १७ तारखेला खेळवल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात लाहोरचा सामना कराचीविरुद्ध होणार आहे.