28 September 2020

News Flash

Hong Kong Open Badminton : प्रणॉयला नमवून श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

१८-२१, ३०-२९, २१-१८ असे केले पराभूत

किदम्बी श्रीकांत (संग्रहीत छायाचित्र)

Hong Kong Open Badminton – या स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांतने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने उप-उपांत्यपूर्व फेरीत सहकारी एच एस प्रणॉयला १८-२१, ३०-२९, २१-१८ असे पराभूत केले. पहिला सेट श्रीकांतला गमवावा लागला. मात्र त्याने चांगलीच झुंज दिली. पण तीन गुणांच्या फरकाने गेम प्रणॉयच्या नावावर झाला. दुसऱ्या गेममध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. हा गेम हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच गेला. अखेर ३०-२९ अशा गुणसंख्येवर श्रीकांतने तो गेम जिंकला आणि सामन्यात बरोबरी राखली. तिसरा गेमदेखील अटीतटीचा झाला. या गेममध्ये पहिल्या गेमची पुनरावृत्ती झाली. फक्त हा गेम प्रणॉय ऐवजी श्रीकांतने जिंकला आणि प्रणॉयला घरचा रस्ता दाखवला.

काल झालेल्या सामन्यांमध्ये भारताची फुलराणी सायना नेहवाल हिला सलमीच्याच सामन्यात गाशा गुंडाळावा लागला. जपानच्या अकाने यामागूची हिने सायनाला २१-१०, १०-२१, १९-२१ असे पराभूत केले. याच स्पर्धेत आधी झालेल्या सामन्यात पी व्ही सिंधूने विजयी सलामी दिली. तृतीय मानांकित पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या नीचाऑन जिंदापॉल हिला २१-१५, १३-२१, २१-१७ असे पराभूत केले. तर पुरुष एकेरीच्या गटात स्विस आणि हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणाऱ्या समीर वर्मा यानेही विजयी सलामी दिली. त्याने थायलंडच्या सुपान्यू अविहींग्सनॉन याचा पराभव केला. त्याने २१-१७, २१-१४ सरळ गेममध्ये हा सामना खिशात घातला. साईप्रणीतला मात्र खोसीतविरुद्ध हार पत्करावी लागली. तो २१-१६, ११-२१, १५-२१ असा पराभूत झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 2:46 pm

Web Title: hong kong open badminton k srikanth beats hs prannoy to enter quarterfinals
Next Stories
1 सध्याचा भारतीय संघ सर्वोत्तम नाही – स्टिव्ह वॉ
2 ‘स्मिथ, वॉर्नर म्हणजे ऑस्ट्रेलियाचे विराट, रोहित’
3 सचिनचं कसोटी संघात पदार्पण; २९ वर्ष जुन्या आठवणींमध्ये रमला क्रिकेटचा देव
Just Now!
X