News Flash

Hong Kong Open : सिंधूचा दमदार विजय; पुढील फेरीत धडक

सायनाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात

(संग्रहित छायाचित्र)

हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत पी.व्ही. सिंधूने दुसऱ्या फेरीत झेप धडक मारली. सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या पी. व्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर असलेल्या कोरिआच्या किम गा ऊन हिला ३६ मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत केले. सामन्यात पी. व्ही सिंधूने चांगली कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूला २१-१५, २१-१६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना थायलंडच्या बुसनान ओंगबारुंगफान हिच्याशी होणार आहे.

त्याआधी सायना नेहवाल आणि समीर वर्मा या भारतीय बॅडमिंटनपटूंचं आव्हान हाँगकाँग ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. आठव्या मानांकित सायनाला चीनच्या कै यान यान ने १३-२१, २०-२२ अशा दोन सेट्समध्ये पराभूत केलं. गेल्या सहा स्पर्धांचा इतिहास पाहता पाच स्पर्धांमध्ये सायना पहिल्याच फेरीतून बाहेर पडली आहे.

पुरुषांमध्ये १६ व्या मानांकित समीर वर्माचं आव्हान चीन तैपेईच्या वँग त्झू वईने अवघ्या ५४ मिनिटांत परतवून लावलं. पहिल्याच फेरीत पराभव स्विकारावा लागण्याची समीरची ही तिसरी वेळ ठरली आहे. सायनाने आपल्या चिनी प्रतिस्पर्ध्याला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा निभाव लागला नाही. दुसऱ्या सेटमध्ये सायनाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला झुंज दिली, मात्र इथेही तिचे प्रयत्न तोकडेच पडले. समीर वर्माही आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या आव्हानाचा सामना करु शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 6:21 pm

Web Title: hong kong open pv sindhu enters 2nd round saina nehwal sameer verma out in 1st round vjb 91
Next Stories
1 IND vs BAN : विराटकडे ‘सुवर्णसंधी’; ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिला कर्णधार
2 मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला ‘बॉल-टॅम्परिंग’ प्रकरणी ICC चा दणका
3 …त्यावेळी वाटलं की सगळं संपलं – विराट
Just Now!
X