सध्या IPLचा १३वा हंगाम मोठ्या जल्लोषात खेळला जात आहे. स्पर्धेत अनेक अनुभवी आणि नव्या दमाचे खेळाडू आपल्या कामगिरीने साऱ्यांना खुश करत आहेत. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलदेखील आपल्या फिरकी गोलंदाजीने चाहत्यांना आनंदित करताना दिसला आहे. IPL संपवल्यानंतर तो लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. युजवेंद्र चहलचा यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा ८ ऑगस्टला संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली होती. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यावेळी धनश्री खूपच चर्चेत होती. त्यानंतर चहलने एक फोटो पोस्ट केल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

युजवेंद्र चहल सध्या युएईमध्ये IPL खेळत आहे. BCCIच्या नियमांनुसार स्पर्धा संपल्याशिवाय चहलला bio-secure bubble सोडता येणार नाही. तसेच इतर कोणालाही बबलच्या आत यायचं असेल तर त्या व्यक्तिलाही आधी सहा दिवसांचं क्वारंटाइन पूर्ण करावं लागणार आहे. अशा परिस्थितीत साखरपुडा झालेले नवे लव्हबर्ड्स चहल-धनश्री हे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आहेत. चहलने नुकताच एक फोटो शेअर केला. त्यात तो आणि धनश्री दोघे एकत्र असून आणि चहलसाठी बनवलेला खास केकही फोटो दिसतो आहे. त्या फोटोवर हा माझा सर्वात आवडता फोटो आहे, अशी कमेंट धनश्रीने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on

धनश्रीची कमेंट-

दरम्यान, धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे १.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला होता. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली होती आणि आता तो IPL 2020मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून चांगली कामगिरी करतानाही दिसतो आहे.