28 November 2020

News Flash

हंगेरी बुद्धिबळ स्पर्धा : मेंडोसाला जेतेपद

ग्रँडमास्टर किताब पटकावण्यासाठी मेंडोसाला आता तिसरा टप्पा पार करावा लागणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

भारताचा १४ वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर लायन मेंडोसाने हंगेरी येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याबरोबरच गोव्याच्या या युवा खेळाडूने ग्रँडमास्टर किताबासाठीचा दुसरा टप्पा पार के ला.

ग्रँडमास्टर किताब पटकावण्यासाठी मेंडोसाला आता तिसरा टप्पा पार करावा लागणार आहे. मेंडोसाचे एलो मानांकन २५१६ असून हंगेरीतील स्पर्धा त्याने ७.५ गुणांसह जिंकली. संपूर्ण स्पर्धेत त्याने एकही पराभव पत्करला नाही. याउलट त्याने स्पर्धेत दोन ग्रँडमास्टर्सवर विजय मिळवला. या स्पर्धेतील अव्वल खेळाडू आणि हंगेरीचा ग्रँडमास्टर फोगारासी टिबोरवरील मेंडोसाचा विजय विशेष होता. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत मेंडोसाने सहा विजय आणि तीन बरोबरी अशी सर्वोत्तम कामगिरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:16 am

Web Title: hungarian chess tournament mendosa won the title abn 97
Next Stories
1 एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा : झ्वेरेव्हचे आव्हान कायम
2 जर्मनीचा धुव्वा उडवत स्पेन उपांत्य फेरीत
3 २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला क्रिकेटचा समावेश, ICC ने दिली माहिती
Just Now!
X