IAAFच्या कॉंटिनेंटल कप स्पर्धेत आज भारताकडून अरपिंदर सिंहने कांस्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. झेक प्रजासत्ताक येथील ऑस्ट्राव्हा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अरपींदरने तिहेरी उडीत कांस्यपदक जिंकले. त्याने १६.५९ मीटरची तिहेरी उडी घेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

या आधी त्याने अरपिंदरने इंडोनेशियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अकराव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर घातली होती. या स्पर्धेतील ते भारताचे १०वे सुवर्णपदक होते. याच प्रकारात भारताचा राकेश बाबुही अंतिम फेरीत दाखल झाला होता, मात्र पदकांच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखणं त्याला जमलं नाही.

अरपिंदरने २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले होते.