News Flash

Cricket World Cup 2019 : युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल ठरला षटकारांचा बादशहा

डिव्हीलियर्सचा विक्रम काढला मोडीत

ख्रिस गेल

विश्वचषकाचा आपला पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम आता ख्रिस गेलच्या नावे जमा झाला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सचा ३७ षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे.

पाकिस्तान संघाला १०५ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर विंडिजच्या संघाने डावाची आक्रमक सुरुवात केली. ख्रिस गेलने दोन षटकार खेचत डिव्हीलियर्सला मागे टाकत आपलं पहिलं स्थान पटकावलं. गेलच्या नावावर आता ४० षटकार जमा आहेत.

त्याआधी आपला पहिला सामना खेळणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला आहे. विंडिजच्या गोलंदाजीचा सामना करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १०५ धावांमध्ये माघारी परतला. विंडिजकडून ओश्ने थॉमसने ४, कर्णधार जेसन होल्डरने ३, आंद्रे रसेलने २ आणि शेल्डन कोट्रेलने १ बळी घेतला.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा जेसन होल्डरचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कोट्रेलने इमाम उल-हकला माघारी धाडत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळतीच लागली. विंडिजच्या गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा मारा करत पाक फलंदाजांना नाकीनऊ आणले. फखार झमान आणि बाबर आझमने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

ओश्ने थॉमस आणि आंद्रे रसेल यांनी पाकिस्तानची मधली फळी कापून काढत सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. एका क्षणाला पाकिस्तानचा संघ १०० धावांचा टप्पा ओलांडतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अखेरच्या फळीत वहाब रियाझने फटकेबाजी करत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 6:11 pm

Web Title: icc cricket world cup 2019 chris gayle has now hit more sixes than anyone in cricket world cup history
टॅग : Chris Gayle
Next Stories
1 Cricket World Cup 2019 : गेलच्या झंजावातापुढे पाकिस्तान बेजार, ७ गडी राखून विंडिज विजयी
2 Cricket World Cup 2019 : कॅप्टन मॉर्गनचा पहिल्याच सामन्यात विक्रम
3 Cricket World Cup 2019: बेन स्टोक्सने घेतलेला ‘हा’ भन्नाट झेल पाहिलात का ?
Just Now!
X