News Flash

‘लॉर्ड्स’वर World Cup Final जिंकण्याचा ‘हा’ आहे कानमंत्र!

आतापर्यंत लॉर्ड्सवर झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात एक समान दुवा आहे

यजमान इंग्लंड अत्यंत थरारक पद्धतीने सुपर ओव्हरच्या माध्यमातून नवा विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

लॉर्ड्सच्या मैदानावर रंगलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिकली होती आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण दुर्दैवाने त्याचा तो निर्णय फसला. कमी धावसंख्येचा सामन्यात अखेर चौकार षटकारांच्या बळावर इंग्लंडला विजेतेपद देण्यात आले. त्या बरोबरच एक विचित्र योगायोग दिसून आला. आजपर्यंत लॉर्ड्सवर झालेल्या प्रत्येक पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या संघाला सामना जिंकता आलेला नाही. १९७५, १९७९, १९८३, १९९९ आणि २०१९ असा ५ वेळा लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामना खेळवण्यात आला,. त्यात प्रत्येक वेळी जो संघ नाणेफेक हरला, त्याच संघाला विश्वविजेतेपद मिळाले. त्यामुळे लॉर्ड्सवर अंतिम सामना असल्यास नाणेफेक हरा आणि विजेतेपद मिळवा हा जणू कानमंत्रच असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 12:52 pm

Web Title: icc cricket world cup 2019 lords cricket grounds world cup final england india west indies australia toss vjb 91
Next Stories
1 मायकल वॉनने साखळी फेरीतच सांगितलं होतं ‘इंग्लंड जिंकणार विश्वचषक’; हा घ्या पुरावा
2 WORLD CUP: लंडनमधील प्रमुख वृत्तपत्रांनी छापलेल्या या भन्नाट हेडलाइन्स पाहिल्यात का?
3 WC 2019 : विल्यमसनने मनंही जिंकली आणि विक्रमही नावे केला…
Just Now!
X