जो रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने वेस्ट इंडिजवर अखेरच्या कसोटी सामन्यात विजय संपादन करत २-१ च्या फरकाने मालिका जिंकली. इंग्लंडकडून अष्टपैलू खेळी करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडला सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही किताबांनी गौरवण्यात आलं. तिसऱ्या कसोटी सामन्याच ब्रॉडने ५०० बळींचा टप्पाही पूर्ण केला आहे. या अष्टपैलू कामगिरीमुळे ब्रॉडचं आयसीसी कसोटी क्रमवारीतलं स्थान सुधारलं आहे. दहाव्या स्थानावरुन झेप घेत ब्रॉडने सर्वोत्तम कसोटी गोलंदाजांच्या यादीत तिसरं स्थान पटकावलं आहे.

ब्रॉडने विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकलं आहे. ब्रॉडच्या खात्यात सध्या ८२३ गूण जमा आहेत. तर जेसन होल्डर ८१० गुणांसह पाचव्या स्थानी घसरला आहे. याव्यतिरीक्त भारताच्या जसप्रीत बुमराहच्या क्रमवारीतही घसरण झाली असून सातव्या स्थानावरुन आठव्या स्थानी घसरला आहे. बुमराहच्या खात्यात सध्या ७७९ गुण जमा आहेत.

अवश्य पाहा – १३ वर्षांच्या संघर्षाची कथा, ५०० कसोटी बळी घेणारा ब्रॉड दिग्गजांच्या पंगतीत

विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. बेन स्टोक्स नेतृत्व करत असलेल्या या सामन्यात ब्रॉडला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. ज्यावरुन ब्रॉडने नाराजीही व्यक्त केली होती. परंतू यानंर दुसऱ्या कसोटी सामन्यात ब्रॉडने संघात पुनरागमन करत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे.

अवश्य वाचा – कसोटीत ५०० बळी घेणं विनोद नाहीये ! युवराजने केलं स्टुअर्ट ब्रॉडचं कौतुक