वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या केन विल्यमसनला आयसीसी क्रमवारीत चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसी क्रमवारीत न्यूझीलंडच्या कर्णधाराने भारतीय कर्णधार विराट कोहलीसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

केन विल्यमसनचं द्विशतक आणि न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि १३४ धावांनी मात केली होती. दुसरीकडे स्टिव्ह स्मिथने क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं असून भारताचा चेतेश्वर पुजाराही सातव्या स्थानी कायम राहिला आहे.

गोलंदाजीत न्यूझीलंडच्या निल वॅगनरच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून तो दुसऱ्या स्थानी आला आहे. भारताचा जसप्रीत बुमराह नवव्या स्थानी कायम आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही रविंद्र जाडेजाने आपलं तिसरं स्थान कायम राखलं आहे.