X
Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूला शुभेच्छा देत ICCने काढली धोनीची कळ!

भारतीय चाहत्यांनी ICCला केले ट्रोल

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल बेव्हन आज आपला ५१वा वाढदिवस साजरा करीत आहे. या खास दिवशी आयसीसीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या दिग्गज फलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना आयसीसीने टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला ट्रोल केले आहे.

आयसीसीने मायकेल बेव्हनचा फोटो पोस्ट करत लिहिले, ”ओरिजनल मॅच फिनिशर मायकेल बेव्हनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” धोनीला मॅच फिनिशर म्हटले जाते. मात्र, आयसीसीने मायकेल बेव्हनला ओरिजनल मॅच फिनिशर म्हणत धोनीची कळ काढली आहे. या ट्विटवर भारतीय चाहत्यांनी आयसीसीला ट्रोल केले आहे.

 

वाचा चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

 

 

 

मायकेल बेव्हनची कारकीर्द

मायकेल बेव्हनने २३२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३.७८च्या सरासरीने ६९१२ धावा केल्या आहेत. मायकेल बेव्हन ६७ वेळा नाबाद राहिला आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये ६ शतके आणि ४६ अर्धशतके झळकावली आहेत. १९९९ आणि २००३ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो महत्वाचा सदस्य राहिला आहे.

20
READ IN APP
X