कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकात भारतीय महिलांसमोर न्यूझीलंडच्या संघाचं आव्हान असणार आहे. ९ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत गयाना, सेंट लुशिया, अँटीगा, बार्बुडा या ४ ठिकाणी महिला विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत, यातील जागतिक क्रमवारीतील पहिल्या ८ संघाना थेट जागा मिळणार आहे. तर उरलेल्या दोन जागांसाठी बांगलादेश, आयर्लंड, नेदरलंड, पापुआ न्यू गिनीआ, स्कॉटलंड, थायलंड, युगांडा, संयुक्त अरब अमिराती हे संघ लढणार आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीने पहिल्यांदाज डीआरएस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.