ICC World Cup 2019 ही स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. या आधी होणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक ICC कडून जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघ या वेळी २ संघांशी सराव सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सराव सामना २५ मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सराव सामना बांगलादेशशी २८ मे रोजी होणार आहे.

या सराव सामन्यानंतर ICC World Cup 2019 रंगणार आहे. इंग्लंडमध्ये हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत १६ जुनला मैदानात उतरणार आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेतील सामने हे रॉबिन-राऊंड पद्धतीने खेळवले जाणार आहे. या प्रकारात प्रत्येक संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्या विरोधात एक सामना खेळणार आहे. यानंतर सर्वोत्तम ४ संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत.