विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरूवात होऊन दोन आठवडे उलटले आहे. प्रत्येक संघाच्या चार ते पाच लढती झाल्या आहेत. काही संघाची पावसामुळे समिकरणे बिघडली आहेत. सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. तर तळाला दुबळा आफगाणिस्तानचा संघ आहे. प्रत्येकदिवशी होणाऱ्या सामन्यांमध्ये नवीन रंगत आणि घडामोडी पहायला मिळतायत. सोमवारी झालेल्या सामन्या बांगलादेशनं विंडीज संघाला पराभवाची चव चाखायला लावत गुणतालिकेत पाचव्या स्थानी उडी घेतली. एकूण दहा संघामध्ये हा महासंग्राम सुरू आहे. यामध्ये काही संघानी पहिल्या सामन्यातापासून आपलं स्थान बळकट केलं आहे, तर काही संघ सुरुवातीपासूनच तळाशी आहेत. विश्वचषकातील गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे, हे जाणून घेऊयात.

संघ सामनेविजयपराभवनेट रनरेटगूण
ऑस्ट्रेलिया+०.८१२ 8
न्यूझीलंड +२.१६३
भारत +१.०२९
इंग्लंड +१.५५७
बांगलादेश -०.२७०
श्रीलंका -१.७७८
विंडीज+ ०.२७४
दक्षिण आफ्रिका – ०.२०८
पाकिस्तान १    ३-१.९३३ ३
अफगाणिस्तान ४ ० ४-१.६३८ ०

संघाच्या गुणांबरोबर वैयक्तिक कामगिरीही महत्वाची मानली जाते. प्रत्येक खेळाडू विश्वचषकासारख्या मोठ्या मंचावर लौकिकास खेळी करण्यास उत्सुक असतो. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अमुलाग्र योगदान देत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असतो. फलंदाजीमध्ये बांगलादेशच्या शाकिबने आघाडी घेतली आहे तर गोलंदाजीमध्ये आमिर आणि स्टार्क आघाडीवर आहेत.

फलंदाजधावागोलंदाजबळी
 शाकिब अल हसन३८४ मोहम्मद आमिर १३
 अॅरोन फिंच  ३४३ मिचेल स्टार्क१३
 रोहित शर्मा३१९ पॅट कमिन्स११
 डेव्हिड वॉर्नर२८१ जोफ्रा आर्चर०९
 जो रूट२७९ मोहम्मद सैफूद्दीन०९