भारत-पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता धूसर झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील मालिकेचा प्रस्ताव बारगळल्यास आमच्याकडे आणखीसुद्धा एक योजना तयार आहे, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले.
आपल्याकडील नव्या योजनेबाबत सविस्तर माहिती सांगण्याचे टाळून येत्या दोन महिन्यांत भारत-पाकिस्तान मालिकेचे धोरण निश्चित होईल, असा आशावाद मात्र खान यांनी प्रकट केला.
‘‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेची शक्यता बळावली आहे. येत्या दोन महिन्यांत याबाबत स्पष्ट होईल. परंतु ही मालिका रद्द झाल्यास आमच्याकडे आणखी एक योजना तयार आहे,’’ असे खान यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 3:09 am