नवी दिल्ली : क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे कठीण आहे. सामनानिश्चितीवर पूर्णत: नियंत्रण मिळवणे शक्य नाही. कारण लोभावर कोणताच इलाज नाही, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. तमिळनाडू प्रीमियर लीगमधील सामनानिश्चितीसंदर्भात चौकशी सुरू आहे. या संदर्भात गावस्कर म्हणाले की, ‘‘लोभ ही अशी भावना आहे, जिथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शिक्षण, मार्गदर्शन आणि चर्चासत्रांची मात्रा उपयोगी ठरत नाही. विकसित समाजातही गुन्हे घडतातच. क्रिकेटमध्येही अशी उदाहरणे आश्चर्यकारकरीत्या समोर आली आहेत.’’