News Flash

Video : असं काय झालं की पंतऐवजी राहुल यष्टीरक्षणासाठी उतरला?? जाणून घ्या…

भारताची २५५ धावांपर्यंत मजल

नवीन वर्षात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासोबत पहिला वन-डे सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने २५५ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय धावगतीवर अंकुश लावला. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने ७४ तर लोकेश राहुलने ४७ धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

मात्र ऑस्ट्रेलियाचे फलंदाज जेव्हा धावसंख्येचा पाठलाग करायला उतरले तेव्हा भारतीय संघात एक बदल झालेला पहायला मिळाला. ऋषभ पंतऐवजी यष्टीरक्षक म्हणून लोकेश राहुल मैदानात दिसला. फलंदाजीदरम्यान पंतच्या हेल्मेटला पॅट कमिन्सचा चेंडू लागला. हा फटका इतका जोरदार होता की पंतला काहीकाळ वैद्यकीय चमुच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं. पाहा हा व्हिडीओ…

याचकारणासाठी पंतला दुसऱ्या डावात काहीकाळ मैदानात न उतरण्याची मुभा देण्यात आली. म्हणूनच ऋषभ पंतऐवजी लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. ऋषभने ३३ चेंडूत २८ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 6:07 pm

Web Title: ind vs aus 1st odi lokesh rahul did wicket keeping job insted of rishabh pant know reason here psd 91
टॅग : Ind Vs Aus,Rishabh Pant
Next Stories
1 Video : जाडेजाने लगावलेला उत्तुंग षटकार एकदा पाहाच
2 Video : आला अंगावर, घेतलं शिंगावर ! पॅट कमिन्सला शिखरचा दणका
3 Video : विराटचा झॅम्पाने घेतलेला हा भन्नाट झेल पाहिला का?
Just Now!
X