News Flash

Ind vs Aus : पृथ्वी शॉ मुळे भारतीय संघावर १३ वर्षांनी ओढावली नामुष्की

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पृथ्वी शून्यावर बाद

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात खराब सुरुवात केली. नाणेफेक जिंकत विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीसाठी मैदानात आलेला पृथ्वी शॉ मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

पृथ्वी शॉ शून्यावर माघारी परतल्यामुळे तब्बल १३ वर्षांनी भारतीय संघावर परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये नामुष्की ओढावली आहे. याआधी २००७ साली चट्टोग्राम येथे झालेल्या बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात एकही धाव न करता एक विकेट गमावली होती.

पहिल्या कसोटीसाठी शुबमन गिलला संधी नाकारत पृथ्वी शॉला संधी दिली. भारतीय संघाच्या निवडीवर चाहत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यातच पहिल्याच कसोटीत खराब सुरुवात करत पृथ्वी शॉने आपल्या टीकाकारांना आयत कोलित हातात दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 10:06 am

Web Title: ind vs aus 1st test due to prithvi shaw failure india face unwanted record in away test after 13 years psd 91
Next Stories
1 Ind vs Aus : पहिल्याच कसोटीत पृथ्वी शॉ शून्यावर बाद, नेटकरी संतापले
2 Ind vs Aus : विराटने नाणेफेक जिंकली, भारत सामनाही जिंकणार…आकडेवारी पाहून तुम्हालाही बसेल विश्वास
3 ये नया इंडिया है ! पहिल्या कसोटीआधी आक्रमक शैलीबद्दल विराटचं वक्तव्य
Just Now!
X