भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या खराब कामगिरीचं सत्र सुरुच राहिलं आहे. लॉकडाउनच्या आधी न्यूझीलंड दौऱ्यात टी-२० आणि वन-डे मालिकेत ऋषभला खराब कामगिरीमुळे संघातलं स्थान गमवावं लागलं. लॉकडाउनपश्चात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याची वन-डे आणि टी-२० संघात निवड करण्यात आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेआधी दुसऱ्या सराव सामन्यात ऋषभ पंतला संधी देण्यात आली.

अवश्य वाचा –  ऋषभ पंत थोडा जाड झालाय, कामगिरीत सुधारणा करण्याची गरज – पार्थिव पटेल

परंतू या संधीचं सोनं करण्यातही पंत अपयशी ठरला. भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पंतनेही ११ चेंडू खर्च करुन केवळ ५ धावा केल्या. वाईल्डरमथने पंतला माघारी धाडलं. ऋषभ पंतसोबत दुसरा यष्टीरक्षक वृद्धीमान साहानेही निराशा केली. २२ चेंडू खेळून एकही धाव न घेता साहा अबॉटच्या गोलंदाजीवर बाद झाला.

अवश्य वाचा – अर्धशतकी खेळीने संघाचा डाव सावरणाऱ्या बुमराहला सहकाऱ्यांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’, पाहा व्हिडीओ

अखेरीस जसप्रीत बुमराहने अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत ७१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. जसप्रीत बुमराहने यादरम्यान प्रथमश्रेणी क्रिकेटमधलं आपलं पहिलं अर्धशतकही झळकावलं. मोहम्मद सिराजनेही २२ धावांची खेळी करत बुमराहला चांगली साथ दिली. याव्यतिरीक्त भारताकडून पृथ्वी शॉने ४०, शुबमन गिलने ४३ धावांची खेळी केली.

अवश्य वाचा – बुमराहच्या अर्धशतकाने वाचवली टीम इंडियाची लाज, सराव सामन्यात भारताचे धुरधंर फेल