ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत पहिल्या दोन सामन्यांपासून हुलकावणी देत असलेला विक्रम अखेरीस रोहित शर्माने आपल्या पदरात पाडून घेतला आहे. बंगळुरुच्या मैदानावर खेळत असताना रोहित शर्माने चौथी धाव काढत वन-डे क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. हा विक्रम पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माला वन-डे मालिका सुरु होण्याआधी केवळ ५६ धावा हव्या होत्या. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये रोहितला हा विक्रम करता आला नाही, अखेरीस बंगळुरुत त्याने ही कामगिरी केली आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित आता तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. रोहितने २१७ व्या डाव्यात ही कामगिरी केली. त्याने यादरम्यान सचिन आणि सौरव गांगुली या माजी भारतीय खेळाडूंना मागे टाकलं.
Fastest to 9000 Odi runs (Inngs)
Kohli – 194
Abd – 205
Rohit – 217*
Ganguly – 228
Sachin – 235#INDvsAUS
— CricBeat (@Cric_beat) January 19, 2020
त्याआधी, स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन या फलंदाजांनी केलेल्या आश्वासक खेळामुळे कांगारुंनी अखेरच्या वन-डे सामन्यात २८६ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचा निर्णय पुरता चुकला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून भेदक मारा करत कांगारुंच्या धावगतीवर अंकुश लावला. मात्र स्मिथ आणि लाबुशेनच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे कांगारुंनी सन्मानजनक धावसंख्या गाठली.
अवश्य वाचा – Video : भन्नाट कॅच आणि हटके सेलिब्रेशन, ‘किंग कोहली’ चा स्वॅग पाहिलात का??