20 January 2021

News Flash

वडिलांच्या मृत्यूचा संदर्भ देताना चुकला गिलख्रिस्ट, सोशल मीडियावर चाहते खवळले

Fox Sports वाहिनीवर कॉमेंट्री करताना गिलख्रिस्टकडून चूक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर पहिल्या वन-डे सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनपश्चात भारतीय संघाचा हा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असल्यामुळे विराटसेनेच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष होतं.
दरम्यान भारतीय संघ गोलंदाजी करत असताना Fox Sports वाहिनीवर समालोचन करणाऱ्या गिलख्रिस्टकडून एक मोठी चूक झाली. काही दिवसांपूर्वी भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन झालं. परंतू गिलख्रिस्टने नवदीप सैनीच्या वडिलांचं निधन झालं असा चुकीचा दाखला दिला. पाहा हा व्हिडीओ…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय चाहत्यांनी याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान आपली चूक लक्षात आल्यानंतर गिलख्रिस्टनेही तात्काळ माफी मागितली आहे.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 11:12 am

Web Title: ind vs aus adam gilchrist error while doing comentry wrong info about saini father death fans angry reaction psd 91
Next Stories
1 कोहलीच्या प्रश्नानंतर BCCI चं रोहितच्या दुखापतीवर स्पष्टीकरण….
2 Ind vs Aus : बाळाच्या जन्मावेळी मला बायकोसोबत रहायचं आहे – विराट कोहली
3 Ind vs Aus : इशांत शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर
Just Now!
X