News Flash

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन कर्णधाराला जाळ्यात अडकवत भुवनेश्वर कुमारची अनोखी हॅटट्रीक

तिन्ही सामन्यात फिंच ठरला भुवीची शिकार

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत अनोख्या कामगिरीची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार अरोन फिंचला तिन्ही वन-डे सामन्यांमध्ये बाद करण्याचा पराक्रम साधत भुवनेश्वर कुमारने अनोखी हॅटट्रीक साजरी केली आहे. सिडनी वन-डे सामन्यात भुवनेश्वरने फिंचचा अवघ्या 6 धावांवर त्रिफळा उडवला होता, मात्र या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर दुसऱ्या सामन्यात अडलेडमध्ये भारताने दमदार पुनरागमन करत सामन्यात बाजी मारली, या सामन्यातही भुवनेश्वरने 6 धावांवर त्रिफळा उडवत फिंचला माघारी धाडलं होतं.

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारल्यामुळे अखेरच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने चांगली सुरुवात केली खरी. मात्र 14 धावसंख्येवर असताना भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फिंच दुसऱ्या स्लिपमध्ये झेल देऊन माघारी परतला. तिन्ही सामन्यांमध्ये फिंचला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 10:25 am

Web Title: ind vs aus bhuvaneshwar kumar gets out australian captain in 3rd odi and complete his unique hat trick
Next Stories
1 Video : दुखापत विसरून संजू सॅमसनची केरळसाठी एका हाताने फलंदाजी
2 ……तर पाकिस्तानचे खेळाडू शौचालयही साफ करतील !
3 भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय
Just Now!
X