मेलबर्न येथे सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातही स्मिथ स्वस्तात बाद झाला आहे. बुमराहनं टाकलेला चेंडू स्मिथला काही कळायच्या आत स्टम्पला जाऊन लागला. स्मिथ अवघ्या आठ धावसंख्येवर क्लीनबोल्ड झाला. स्मिथला बाद करत बुमराहनं भारतीय संघाच्या विजायातील मोठा अडथळा दूर केला आहे.

३३ व्या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर लेग साइडला कट करण्याच्या नादात स्मिथकडू चेंडू सुटला आणि यष्टीरक्षकाकडे गेला. मात्र, जाताना चेंडू स्टम्पला घासला. त्यामुळे बेल्स पडली. बेल्स पडल्याचं स्मिथ आणि अश्विनलाही समजलं नाही. बुमराहने पंचाकडे एलबीडब्ल्यूसाठी अपील केली, इतक्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने खेळपट्टीवर येत स्टंप्सकडे इशारा केला, तेव्हा बेल्स उडाल्या असल्याचे सर्वांच्या लक्षात आहे. स्मिथ देखील चकित होऊन खेळपट्टीवरच उभा राहिला होता. मात्र भारतीय खेळाडूंनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केल्याचं पाहून जेव्हा स्मिथने मागे वळून पहिले तेव्हा स्टंपवरील बेल्स पडल्याचे त्याला समजलं. त्यानंतर स्मिथला मैदान सोडून जावं लागलं.

आणखी वाचा- अजिंक्य रहाणेचं शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात महत्वपूर्ण – सुनिल गावसकर

आणखी वाचा- रहाणेचा मास्टरस्ट्रोक; राहुलऐवजी जाडेजाला खेळवण्याचा डावपेच यशस्वी

स्मिथ पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येवर बाद होऊन माघारी परतला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. उमेश यादवने सलामीवीर फलंदाज जो बर्नला स्वस्तात माघारी झाडलं. त्यानंतर अश्विन, बुमराह आणि जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियानं सध्या चार गड्यांच्या मोबदल्यात ९८ धावा केल्या आहेत. अद्याप भारतीय संघाकडे पहिल्या डावातील ३३ धावांची आघाडी आहे.