28 September 2020

News Flash

IND vs AUS : …..त्यावेळी मी देखील थोडा घाबरलो होतो – ऋषभ पंत

Nervous 90 चं चक्रव्यूह भेदून पंतचं शतक

भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने 2018 साली भारताच्या इंग्लंड दौऱ्यात पदार्पण केलं. ओव्हन कसोटी सामन्यात ऋषभने शतकी खेळी करुन सर्वांना आपली दखलही घ्यायला भाग पाडलं. मात्र यानंतर घरच्या मैदानात विंडीजविरुद्ध खेळत असताना ऋषभ पंत दोनवेळा नव्वदीत बाद झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रचलित असलेली Nervous 90 ची पिडा पंतच्या मागेही लागल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र सिडनी कसोटी सामन्यात आज पंतने हे चक्रव्यूह भेदून शतक साजरं केलं. मात्र 90 धावांचा टप्पा पार केल्यानंतर मी थोडासा घाबरलो होतो हे पंतने मान्य केलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : ऋषभ पंतने शतकाचं क्रेडीट दिलं रविंद्र जाडेजाला

“अगदी मनापासून सांगायचं झालं तर 90 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर मी देखील मनातून थोडासा घाबरलो होतो. याआधी मी दोन वेळा 92 धावांवर बाद होण्याचा अनुभव घेतला आहे. ती गोष्ट माझ्या मनात घोळत होती, मात्र तिचा विचार न करत बसता मी झटपट शतक झळकावून मोकळा झालो.” सामना संपल्यानंतर ऋषभ पंत पत्रकारांशी बोलत होता. ऋषभ पंतने रविंद्र जाडेजासोबत 204 धावांची भागीदारी रचली, या जोरावर भारताने 622 धावांचा टप्पा गाठला. ऋषभ पंतने नाबाद 159 धावा पटकावल्या. आपल्या या शतकाचं श्रेयही त्याने रविंद्र जाडेजाला दिलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत शतक झळकावणारा पंत पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : द्विशतक हुकलं मात्र पुजाराच्या नावावर विक्रमांचा षटकार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 5:18 pm

Web Title: ind vs aus was scared when i entered into the 90s says rishabh pant
Next Stories
1 IND vs AUS : ऋषभ पंतने शतकाचं क्रेडीट दिलं रविंद्र जाडेजाला
2 IND vs AUS : मालिकेत एक अख्खी कसोटी पुजारानेच केली फलंदाजी
3 Video: शतकी खेळी करण्याआधी विराटनेच नेटमध्ये घेतला होता पंतचा सराव
Just Now!
X