News Flash

Video : ‘टीम इंडिया’ कोलकातामध्ये दाखल, पारंपरिक पद्धतीने दणक्यात स्वागत

दिवस-रात्र कसोटीसाठी कोलकाता 'गुलाबी'मय

भारत आणि बांगलादेश या दोनही संघांसाठी पहिला दिवस-रात्र कसोटी सामना शुक्रवारपासून (२२ नोव्हें) सुरू होणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला एक डाव आणि १३० धावांनी धूळ चारली. त्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ कोलकातामध्ये दाखल झाला. कसोटी मालिकेतील पहिला सामना लवकर संपला होता. त्यामुळे आधी भारतीय संघाने गुलाबी चेंडूने सराव केला. त्यानंतर मंगळवारी भारतीय संघ कोलकातामध्ये दाखल झाला. या वेळी भारतीय संघाचे पारंपरिक पद्धतीने दणक्यात स्वागत करण्यात आले.

पहा व्हिडीओ –

कोलकाता ‘गुलाबी’मय

भारत-बांगलादेश प्रकाशझोतातील ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी कोलकाता शहर गुलाबी रंगात न्हाऊन निघाले आहे. कोलकातातील रस्त्यांपासून ते हॉटेलपर्यंत सगळीकडे गुलाबी वातावरण पाहायला मिळत आहे. या सामन्याद्वारे बंगाल क्रिकेट असोसिएशन चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी गमावत नसून संघटनेच्या मुख्य कार्यालयावरसुद्धा गुलाबी छटा उमटली आहे.

IND vs BAN : दिवस-रात्र कसोटीआधी टीम इंडियासाठी ‘गुड-न्यूज’

‘पिंकू’ बोधचिन्ह

गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या या कसोटीसाठी खास गुलाबी रंगातच बोधचिन्ह बनवण्यात आले असून त्याला ‘पिंकू’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली याने मंगळवारी या ‘पिंकू’सह ट्विटरवर छायाचित्र पोस्ट केले होते. सामन्याच्या सर्व दिवशी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारावर चाहत्यांचे स्वागत करण्याबरोबरच सामन्यादरम्यानही हा पिंकू चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.

IND vs BAN : “केवळ खेळाडूच नव्हे, पंचांनाही सरावाची गरज”

पहिले चार दिवस हाऊसफुल्ल

कोलकाता कसोटीच्या पहिल्या चार दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. जवळपास ६८ हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या ईडन गार्ड्न्सवरील या कसोटीसाठी चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे बांगलादेशने कडवी झुंज दिल्यास चाहत्यांना एका रोमहर्षक सामन्याचा अनुभव मिळू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 12:04 pm

Web Title: ind vs ban india vs bangladesh video team india arrived at kolkata for historic day night test match pink ball match received traditional welcome vjb 91
Next Stories
1 IND vs BAN : “केवळ खेळाडूच नव्हे, पंचांनाही सरावाची गरज”
2 IND vs BAN : दिवस-रात्र कसोटीआधी टीम इंडियासाठी ‘गुड-न्यूज’
3 भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात
Just Now!
X