टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका २-१ने जिंकली. या सामन्यात शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने एका चुकीच्या निर्णय घेतला नसता, तर कदाचित भारताचा पराभव टळला असता, असे मत फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.

शेवटच्या षटकात भारताला जिंकण्यासाठी १६ धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने फटका मारला, तेव्हा एक धाव काढायची संधी उपलब्ध होती. पण एक धाव काढून कृणाल पांड्याला स्ट्राइक देण्याऐवजी त्याने स्वत:कडेच स्ट्राइक ठेवणे त्याने पसंत केले. महत्वाची बाब म्हणजे कृणालने त्या सामन्यात आधी चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली होती. त्याने १९व्या षटकात १८-१९ धावा ठोकल्या होत्या. पण तरीदेखील कार्तिकने त्याला संधी न देता स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. त्या कार्तिकच्या चुकीच्या निर्णयामुळे भारत सामना हारला. जर तेथे कार्तिकने १ धाव काढली असती, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता, असे हरभजन एका कार्यक्रमात म्हणाला.

शेवटच्या चेंडूवर षटकार लगावणे म्हणजेच फिनिशींग बॅट्समन होणे नाही. बरोबर असलेल्या फलंदाजावर विश्वास ठेवणे आणि देशाला जिंकू देणे हे खऱ्या ‘फिनिशर’चं कसब आहे. तसेच कार्तिकने ‘तो’ निर्णय का घेतला? याबद्दल त्याला संघ व्यवस्थापन निश्चितच प्रश्न विचारेल, अशीही आशा हरभजनने व्यक्त केली.