भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या निर्णय बनहरतीय गोलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांना अक्षरश: झोडपून काढले. सलामीवीर कॉलिन मुनरो आणि सिफर्ट यांनी ८६ धावांची सलामी दिली आणि न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली. पण सामन्यात लक्षवेधी ठरला तो दिनेश कार्तिकने सीमारेषेवर घेतलेला झेल..

डॅरेल मिचेल याने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर लगावला फटका सीमारेषा पार करणार असे वाटत असतानाच दिनेश कार्तिकने एक अफलातून झेल टिपला आणि त्याला माघारी धाडले. मिचेल १५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर खेळत होता. त्याने हार्दिकच्या गोलंदाजीवर जोरदार फटका लगावला. चेंडू आकाशात उंच गेला आणि चेंडू सीमारेषा पार करणार इतक्यात दिनेश कार्तिकने चेंडू अडवला आणि आत फेकला. तेथेच तो थांबला नाही. तर त्याने पुन्हा आत येऊन तो चेंडू झेलला आणि मिचेलला तंबूत पाठवले.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १५ षटकात ४ बाद १६४ धावा केल्या होत्या.