28 September 2020

News Flash

IND vs SA : रोहितच्या तडाख्याचा दिलशानच्या विक्रमाला फटका

रोहितने मोडला १० वर्षांपूर्वीचा दिलशानचा विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून प्रथमच खेळणाऱ्या रोहित शर्माने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. पहिल्या डावात १७६ धावांची खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळी करत शतक ठोकले. रोहित शर्माने सलामीवीर म्हणून खेळताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्या दरम्यान त्याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याने श्रीलंकेच्या माजी धडाकेबाज फलंदाजाचा विक्रम मोडला.

रोहित शर्माने पहिल्या डावात २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पहिल्या डावात त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. हीच लय कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यातदेखील शतक ठोकले. रोहितने दुसऱ्या डावात १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या डावात रोहितने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्यानुसार त्याने दोनही डावात मिळून ३०३ धावा केल्या. एखाद्या संघाकडून प्रथमच सलामीला फलंदाजी करतानाची ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.

या आधी श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशन याने २००९ साली गॉल येथील कसोटी क्रिकेट सामन्यात २१५ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून प्रथमच त्याला सलामीला न्यूझीलंड संघाविरूद्ध संधी देण्यात आली होती. त्यावेळी पहिल्या डावात त्याची शतकाची संधी हुकली होती. तो ९२ धावांवर माघारी परतला होता. पण दुसऱ्या डावात मात्र त्याने शतकाला गवसणी घातली होती. त्या डावात तो १२३ धावांवर नाबाद राहिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 6:07 pm

Web Title: ind vs sa rohit sharma creates history by scoring most runs in single test match batting first time as opener vjb 91
Next Stories
1 IND vs SA : रोहितचा धुमधडाका! पाकच्या माजी कर्णधाराचा २३ वर्ष जुना विक्रम मोडीत
2 Ind vs SA : दोन्ही डावांत शतकं झळकावूनही रोहित नकोशा कामगिरीचा धनी
3 IND vs SA : ‘जगात भारी’! टीम इंडियाच्या ‘हिटमॅन’चा दणकेबाज पराक्रम
Just Now!
X