भारत आणि विंडीज यांच्यात झालेला दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. भारताने ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत विंडीजने भारताशी बरोबरी साधली. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीचा झाला. या सामन्यात एक क्षण असा होता जिथे भारताने सामना गमावला असे चाहत्यांनी मनात पक्के केले होते. पण अंतिम काझी षटकांमध्ये गोलंदाजीत अचूकतेमुळे भारताने सामना बरोबरीत राखला.

या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याला आपल्या संघाबाबत विचारले असता त्याने प्रथम विंडीजच्या संघाचे कौतुक केले. विंडीजचा संघ उत्तम खेळला म्हणूनच हा सामना बरोबरीत सुटला, असे म्हणत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवत प्रतिस्पर्धी संघाची स्तुती केली.

दुसरा एकदिवसीय सामना हा काही उत्तम सामन्यांपैकी एक होता. विंडीजच्या संघाला याचे श्रेय द्यायला हवे. या संघाचे सर्वच खेळाडू उत्तम खेळतात. पण या सामन्यातदेखील त्यांनी उत्तम कामगिरी केली. सामना बरोबरीत सोडवण्याबाबत बोलायचे तर हेटमायर आणि होप यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याच्यामुळे विंडिजचा पराभव टळला, असे विराट म्हणाला.