01 October 2020

News Flash

IND vs WI : तिसऱ्या वन-डे आधी ‘टीम इंडिया’ला दिलासा

२७ ऑक्टोबरला तिसरा सामना

विंडीजच्या शाय होपने केलेल्या १२३ धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारत-विंडीज दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. भारताने ५० शतकात ६ बाद ३२१ धावा केल्या. तर आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या विंडीजने ५० षटकात ७ बाद ३२१ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत हा सामना विंडीजने बरोबरीत सोडवला.

या सामन्यात विंडीजकडून चौकार आणि षटकारांची बरसात करण्यात आली. यातील एका षटकार रोखण्याचा प्रयत्न करताना भारताच्या ऋषभ पंतला दुखापत झाली होती.

पण ही दुखापत गंभीर नसल्याचे BCCIने स्पष्ट केले आहे.

अशी झाली दुखापत –

३५ षटकांचा खेळ पूर्ण झाला होता. ३६व्या षटकाचा पहिला चेंडू युझवेन्द्र चहलने फेकला. रोवमन पॉवेलने हा चेंडू उंच टोलवला. सीमारेषेवर हा चेंडू झेलला जाणार की सीमारेषा पार करून चेंडू फलंदाजाला ६ धावा मिळवून देणार, हा प्रश्न होता. खूप वेळ चेंडू हवेत राहिल्यानंतर ऋषभ पंतने चेंडू झेलला पण तो चेंडू सीमारेषेबाहेर झेलण्यात आला. त्याच ओघात ऋषभ पुढे गेला आणि सीमारेषेबाहेरील होर्डिंगवर जोरात आदळला.

त्यानंतर त्याला तंबूत घेऊन जाण्यात आले आणि त्या जागी मनीष पांडे राखीव खेळाडू म्हणून मैदानात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 2:39 pm

Web Title: ind vs wi relief for team india as rishabh pants injury is not serious says bcci
Next Stories
1 IND vs WI : बरोबरीत सुटलेल्या सामन्याबद्दल कुलदीप यादव म्हणतो…
2 IND vs WI : विराटची घाई नडली अन सामना बरोबरीत सुटला
3 IND vs WI : धोनीला निवृत्तीचा सल्ला; भाजपा नेत्याचा नेटिझन्सने घेतला समाचार
Just Now!
X