News Flash

Video : शिखर धवनचा ‘सुपर सेव्ह’, सीमारेषेवर हवेतच अडवला उत्तुंग षटकार

संघासाठी वाचवल्या ५ धावा

विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी२० सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेवर ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. निकोलस पूरनच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर विंडीजने २० षटकात भारताला १८२ धावांचे आव्हान दिले होते. भारताचा ‘गब्बर’ सलामीवीर शिखर धवन याने ९२ धावांची फटकेबाज खेळी करत भारताला सामना जिंकवून दिला. त्याला सामनावीर देखील घोषित करण्यात आले.

शिखरने केवळ फलंदाजीतच नव्हे तर क्षेत्ररक्षण करतानाही आपले सर्वस्व पणाला लावल्याचे दिसून आले. सामन्यात कृणाल पांड्या सहावे षटक फेकत होता. त्यावेळी सलामीवीर होप आणि हेटमायर हे जोरदार फटकेबाजी करत होते. त्यापैकी एकाने करुणालने टाकलेला षटकातील चौथा चेंडू हवेत उंच आणि लांब टोलवला. पण तो चेंडू सीमारेषा पार करू शकला नाही. शिखर धवनने सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षण करत तो चेंडू आत फेकला आणि संघासाठी ५ धावा वाचवल्या.

हा पहा व्हिडीओ –

BCCIकडूनही कौतुक

दरम्यान, पहिल्या डावात विंडीजच्या डॅरेन ब्राव्हो आणि निकोलस पूरन या जोडीने जोरदार फटकेबाजी केली आणि विंडीजला १८१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पूरनच्या नाबाद अर्धशतकात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता, तर ब्राव्होच्या ४३ धावांच्या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. भारताकडून शिखरने १० चौकार आणि २ षटकार खेचत ९२ धावा केल्या, तर ऋषभ पंतने ३८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार फाटकावत ५८ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 12:22 pm

Web Title: ind vs wi video shikhar dhawan saves 5 runs for the team by saving six on the boundary line
Next Stories
1 ‘मुनाफ पटेलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो’
2 रोहित सर्वाधिक स्फोटक फलंदाज
3 डिसेंबरमध्ये पुनरागमनाचे साहाचे लक्ष्य
Just Now!
X