12 August 2020

News Flash

Ind vs WI : अखेरच्या वन-डेत विंडीज सलामीवीरांची फटकेबाजी, १७ वर्षांनी रचला विक्रम

गेल-लुईसची ११५ धावांची भागीदारी

टी-२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, वन-डे मालिकेतही यजमान विंडीज संघाच्या फलंदाजांना सूर सापडत नव्हता. अखेरीस तिसऱ्या वन-डे सामन्यात विंडीजच्या सलामीवीरांनी आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांना पळता भुई थोडी केली.

या भागीदारीदरम्यान विंडीजच्या सलामीवीरांनी तब्बल १७ वर्षांच्या कालावधीनंतर विक्रमाची नोंद केली. विंडीजच्या सलामीवीरांनी ९.१ षटकांमध्येच संघाचं शतक धावफलकावर लावलं. २००२ पासून वन-डे क्रिकेटमध्ये विंडीजच्या संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती.

ख्रिस गेलने ४१ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत ख्रिस गेलने ८ चौकार आणि ५ षटकार लगावले. खलिल अहमदने ख्रिस गेलला विराट कोहलीकरवी झेलबाद करत भारताला अपेक्षित यश मिळवून दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2019 11:16 pm

Web Title: ind vs wi west indies openers start aggressively in 3rd odi set record after 17 years psd 91
टॅग Ind Vs WI
Next Stories
1 Raksha Bandhan 2019 : विंडीज दौऱ्याआधी अजिंक्यने पार पडली भावाची जबाबदारी
2 भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा, क्विंटन डी-कॉक टी-२० संघाचा कर्णधार
3 Ind vs WI 3rd ODI : विराटची शतकी खेळी, भारताची विंडीजवर ६ गडी राखून मात
Just Now!
X