20 April 2019

News Flash

रवि शास्त्रींचा टीकाकारांवर हल्लाबोल

भारतीय लोकांना टीम इंडियाचा पराभव पाहणे आवडते

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय लोकांना टीम इंडियाचा पराभव पाहणे आवडते आणि तसे झाल्यास त्यांना आनंद मिळतो, अशा शब्दांत प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी टीकाकारांवर हल्लाबोल केला आहे. भारतीय टीकाकारांच्या दुटप्पी बोलण्याचा शास्त्री यांनी समाचार घेतला. ‘जेव्हा आम्ही बलाढय़ संघाला पराभूत करतो, तेव्हा तो संघ क्षमतेप्रमाणे खेळला नाही, असे म्हटले जाते. जेव्हा श्रीलंकेला पराभूत करतो, तेव्हा ती टीम तर कमकुवतच होती, असे म्हटले जाते. मात्र, जेव्हा आम्ही पराभूत होतो, तेव्हा सगळ्या बाजूंनी टीका केली जाते. अशा टीकाकारांना काय उत्तर द्यावे, हेच समजत नसल्याचे शास्त्री एका मुलाखतीत म्हणाले.

 

First Published on March 2, 2018 1:50 am

Web Title: india coach ravi shastri sensational attack on critics