19 September 2020

News Flash

स्टार्कच्या गोलंदाजीला सामोरे जाण्यासाठी भारतीय संघाचा जालीम उपाय..

भारताने सरावासाठी एक अनोखी शक्कल लढवली

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजी टप्प्याचा नेमका अभ्यास करून त्यावर फटके खेळण्यासाठी अनिकेत चौधरीची गोलंदाजी भारतीय फलंदाजांना मदत देणारी ठरेल.

भारत दौऱयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जोरदार तयारी करत आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठलेल्या भारतीय संघाला मायभूमीत मात देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने महिनाभर आधीच योजना आखण्यास सुरूवात केलेली आहे. पण भारतीय संघाने देखील ऑस्ट्रेलियाचे आव्हान फोडून काढण्यासाठीची आखणी सुरू केली आहे. भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध हैदराबादमध्ये कसोटी सामना खेळत आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीला जशास जसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सरावासाठी त्यादृष्टीने एक अनोखी शक्कल लढवली आहे. मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा तुरूपचा एक्का समाजला जातो. या डावखुऱया गोलंदाजाचा समाचार घेण्यासाठी भारतीय संघाचे फलंदाज नेटमध्ये त्यादृष्टीने ठराविक सराव करत आहेत. स्टार्कच्याच उंचीच्या डावखुऱया अनिकेत चौधरी या गोलंदाजाची मदत घेऊन भारतीय फलंदाज नेटमध्ये सराव करताना दिसले.

 

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजी टप्प्याचा नेमका अभ्यास करून त्यावर फटके खेळण्यासाठी अनिकेत चौधरीची गोलंदाजी भारतीय फलंदाजांना मदत देणारी ठरेल. उजव्या हाताच्या फलंदाजांना स्टार्कची गोलंदाजी खेळणे कठीण जात असल्याचे आपण पाहिले आहे. भारतीय संघात उजव्या हाताने खेळणारेच सर्वाधिक फलंदाज आहेत. त्यामुळे अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीवर जास्तीत जास्त नेटमध्ये घाम गाळून स्टार्कच्या गोलंदाजीचा अंदाज बांधता येईल, या उद्देशाने सराव केला जात आहे. स्टार्कच्या इनस्विंग यॉर्करची ताकद संपूर्ण क्रिकेट विश्वाला ठावूक आहे. स्टार्कचे हे अस्त्र फोडून काढण्यासाठी भारतीय संघाने पूर्ण ताकदीनिशी तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या अ संघाकडून अनिकेत चौधरीला खेळविण्यात आले होते. या सामन्यात चौधरीने चार विकेट्स देखील घेतल्या होत्या. विशेष म्हणजे, याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी देखील भारतीय फलंदाजांनी नेटमध्ये अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीचा सराव केला होता. किवींचा डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या आव्हानाला सहज सामोरे जाण्यासाठी भारतीय फलंदाजांनी तसा सराव केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:20 pm

Web Title: india finds a way to counter the starc
Next Stories
1 ‘हिट मॅन इज बॅक’, दुखापतीवर मात करून रोहित शर्माची सरावाला सुरूवात
2 VIDEO: मानसी जोशीचा भन्नाट स्विंग, थायलंडची फलंदाज क्लीनबोल्ड
3 सानिया मिर्झाला सेवा कर विभागातर्फे नोटीस
Just Now!
X