News Flash

ट्वेन्टी-२० क्रमवारी : भारत तिसऱ्या स्थानी कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारताने तिसरे स्थान कायम राखले आहे,

| September 2, 2013 02:54 am

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारताने तिसरे स्थान कायम राखले आहे, त्याचबरोबर भारताचा विराट कोहली फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर कायम आहे. भारतीय संघ १२१ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असून अव्वल स्थानावर श्रीलंका आहे, तर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे. कोहलीने ७३१ गुणांसह सहावे स्थान कायम राखले असून या क्रमवारीत अव्वल स्थानावर इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्स आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये युवराज चौथ्या स्थानावर विराजमान आहे. गोलंदाजीमध्ये वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरिन अव्वल स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 2:54 am

Web Title: india retain third spot in icc t 20 rankings
Next Stories
1 फेडरर, नदाल सुसाट!
2 आयबीएलमुळे खूप काही शिकायला मिळाले -के.श्रीकांत
3 अल्पावधीतच आयबीएलला आयपीएलची भव्यता लाभेल -सायना
Just Now!
X