02 March 2021

News Flash

ऋषभ पंत विश्वचषकासाठी संघात हवाच – मोहम्मद अझरुद्दीन

पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवा !

अल्पावधीतच आपल्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणातील कौशल्यामुळे सर्वांची मन जिंकलेल्या ऋषभ पंतला, विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळाली अशी मागणी होत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने ऋषभ पंत विश्वचषकात अंतिम 11 जणांच्या संघात जागा मिळवण्यासाठी पात्र ठरत असल्याचं म्हटलंय. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभने यष्टींमागे सर्वाधिक झेल पकडण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.

“जर भारत 2019 चा विश्वचषक जिंकू शकला नाही तर ती एक दुर्भाग्यपूर्ण गोष्ट असेल. विश्वचषक पुन्हा भारतात आणण्यासाठी भारतीय संघाकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. भारताने ऋषभ पंतला अंतिम 11 जणांच्या संघात जागा देऊन त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायला हवं. मात्र भविष्यामध्ये कसोटी क्रिकेटचा विचार केला असता ऋषभला आपल्या यष्टीरक्षण कौशल्यात बदल करण्याची गरज आहे.” अझरुद्दीन मिड-डे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऋषभ पंतच्या नावावर 9 कसोटी, 3 वन-डे आणि 13 टी-20 सामन्यांचा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत त्याला संघात संधी देण्यात आली होती, जिचा पंतने चांगला वापर केला. विश्वचषकाआधी भारतीय संघाला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाशी 2 टी-20 आणि 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे या सर्व सामन्यांमध्ये ऋषभ पंतला संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2019 8:22 am

Web Title: india should include rishabh pant in the playing xi for the world cup says mohammad azharuddin
टॅग : Rishabh Pant
Next Stories
1 महिला क्रिकेटला योग्य न्याय देण्यासाठी ‘एमसीए’ प्रयत्नशील!
2 ऑलिम्पिकआधी विश्वविक्रम रचण्याचे ध्येय -मीराबाई
3 ऑल इंग्लंडच्या तयारीसाठी राष्ट्रीय स्पर्धा महत्त्वाची!
Just Now!
X