16 October 2019

News Flash

‘हिटमॅन’ची शतकी खेळी व्यर्थ, सिडनी वन-डे सामन्यात कांगारुंची बाजी

३ सामन्यांच्या मालिकेत कांगारु १-० ने आघाडीवर

सलामीवीर रोहित शर्माचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे सिडनी वन-डे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. झाय रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फने केलेल्या भेदर माऱ्यासमोर भारताची फलंदाजी पुरती कोलमडली.  ५० षटकांमध्ये भारत ९ गड्यांच्या मोबदल्यात २५४ धावांपर्यंत मजल मारु शकला. अखेरीस ऑस्ट्रेलियाने ३४ धावांनी बाजी मारत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला ऑस्ट्रेलियन संघाचा हा एक हजारावा विजय ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. शिखर, विराट आणि रायुडू हे झटपट माघारी परतले. यानंतर रोहित शर्माने धोनीच्या साथीने भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने नेटाने ऑस्ट्रेलियन माऱ्याचा सामना करत १३३ धावांची शतकी खेळी उभारली. मात्र धोनीचा अपवाद वगळता एकही फलंदाज त्याला योग्य साथ न देऊ शकल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात बाजी मारली. मधल्या फळीत धोनीने ५१ धावांची अर्धशतकी खेळी करुन रोहितला चांगली साथ दिली खरी, मात्र यासाठी त्याने तब्बल ९६ चेंडू खर्ची घातले. या संथ खेळीचा फटका पुढे भारताला बसला. अखेरच्या फळीत भुवनेश्वर कुमारने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसनने ४, बेहरनडॉर्फने २ बळी घेतले. त्यांना पिटर सिडल आणि स्टॉयनिसने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी, पिटर हँडस्काँब, उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या वन-डे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २८९ धावांचं आव्हान ठेवलं. कांगारुंनी ५० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात २८८ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, कर्णधार फिंच त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि पीटर हँडस्काँब यांनी एकामागून एक अर्धशतकी खेळी करुन संघाचा डाव सावरला. तिन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना केला. हँडस्काँबने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत यजमान संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात हँडस्काँब माघारी परतला.

भारताकडून कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना रविंद्र जाडेजाने १ बळी घेत चांगली साथ दिली. मोहम्मद शमीने १० षटकात ४६ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला वेसण घातली, मात्र त्याला विकेट मिळवता आली नाही.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

 • 15:06 (IST)

  रोहित शर्माचं शतक, भारताच्या हिटमॅनची झुंज सुरुच

  रोहितने एका बाजूने आपली झुंज सुरुच ठेवली असून, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत त्याने शतकी खेळीची नोंद केली

 • 14:38 (IST)

  अर्धशतकी खेळी करुन धोनी माघारी

  जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर धोनी पायचीत होऊन माघारी

 • 14:36 (IST)

  धोनी-रोहित शर्माची शतकी भागीदारी

  चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये शतकी भागीदारी, भारताची बाजू मजबूत

 • 13:45 (IST)

  रोहित शर्मा - महेंद्रसिंह धोनीची भागीदारी, भारताचा डाव सावरला

  दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

 • 12:31 (IST)

  रिचर्डसनचे भारताला दणके

  एकाच षटकात विराट कोहली आणि अंबाती रायुडू माघारी. भारताचे ३ गडी स्वस्तात तंबूत परतले

 • 11:17 (IST)

  फटकेबाजी करण्याच्या नादात हँडस्काँब माघारी

  भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर शिखर धवनने घेतला झेल. हँडस्काँबच्या ६१ चेंडूत  ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ७३ धावा

 • 11:01 (IST)

  पिटर हँडस्काँबचंही अर्धशतक, कांगारुंनी ओलांडला २०० धावांचा टप्पा

  मार्श माघारी परतल्यानंतर हँडस्काँबने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं आहे. याचसोबत त्याने ऑस्ट्रेलियाला २०० धावांचा टप्पाही ओलांडून दिला आहे

 • 09:48 (IST)

  ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश, ख्वाजा माघारी

  रविंद्र जाडेजाने ख्वाजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. उस्मान ख्वाजाच्या ८१ चेंडूत ६ चौकारांसह ५९ धावा

 • 09:38 (IST)

  ख्वाजा - शॉन मार्श जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला

  दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला आहे

 • 08:05 (IST)

  ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात, कर्णधार फिंच माघारी

  भुवनेश्वर कुमारने उडवला फिंचचा त्रिफळा

15:54 (IST)12 Jan 2019
अखेरच्या चेंडूवर शमी माघारी, ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब

स्टॉयनिसने घेतला बळी, कांगारुंची ३४ धावांनी सामन्यात बाजी

15:53 (IST)12 Jan 2019
पिटर सिडलच्या गोलंदाजीवर कुलदीप यादव माघारी

भारताला आठवा धक्का, प्रदीर्घ वर्षांच्या पुनरागमनानंतर सिडलला आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिलाच बळी

15:30 (IST)12 Jan 2019
रोहित शर्मा माघारी, भारताला सातवा धक्का

१३३ धावांची खेळी करुन हिटमॅन माघारी, ऑस्ट्रेलिया सामन्यात वरचढ

15:22 (IST)12 Jan 2019
रविंद्र जाडेजा माघारी, भारताला सहावा धक्का

रिचर्डसनचा भारताला आणखी एक दणका

15:06 (IST)12 Jan 2019
रोहित शर्माचं शतक, भारताच्या हिटमॅनची झुंज सुरुच

रोहितने एका बाजूने आपली झुंज सुरुच ठेवली असून, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत त्याने शतकी खेळीची नोंद केली

15:05 (IST)12 Jan 2019
दिनेश कार्तिक माघारी, भारताला पाचवा धक्का

रिचर्डसनच्या गोलंदाजीवर कार्तिक त्रिफळाचीत

14:38 (IST)12 Jan 2019
अर्धशतकी खेळी करुन धोनी माघारी

जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर धोनी पायचीत होऊन माघारी

14:36 (IST)12 Jan 2019
धोनी-रोहित शर्माची शतकी भागीदारी

चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये शतकी भागीदारी, भारताची बाजू मजबूत

13:52 (IST)12 Jan 2019
रोहित शर्माचं अर्धशतक

ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा नेटाने सामना करत रोहितचं अर्धशतक

13:45 (IST)12 Jan 2019
रोहित शर्मा - महेंद्रसिंह धोनीची भागीदारी, भारताचा डाव सावरला

दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

12:31 (IST)12 Jan 2019
रिचर्डसनचे भारताला दणके

एकाच षटकात विराट कोहली आणि अंबाती रायुडू माघारी. भारताचे ३ गडी स्वस्तात तंबूत परतले

12:15 (IST)12 Jan 2019
भारताला पहिला धक्का, शिखर धवन बाद

जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर शिखर धवन माघारी

11:35 (IST)12 Jan 2019
भारताला विजयासाठी २८९ धावांचं आव्हान

५० षटकात ऑस्ट्रेलियाची ५ गड्यांच्या मोबदल्यात २८८ धावांपर्यंत मजल.

भारताकडून कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी २-२ बळी, रविंद्र जाडेजाला १ बळी

11:17 (IST)12 Jan 2019
फटकेबाजी करण्याच्या नादात हँडस्काँब माघारी

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर शिखर धवनने घेतला झेल. हँडस्काँबच्या ६१ चेंडूत  ६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ७३ धावा

11:01 (IST)12 Jan 2019
पिटर हँडस्काँबचंही अर्धशतक, कांगारुंनी ओलांडला २०० धावांचा टप्पा

मार्श माघारी परतल्यानंतर हँडस्काँबने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं आहे. याचसोबत त्याने ऑस्ट्रेलियाला २०० धावांचा टप्पाही ओलांडून दिला आहे

10:32 (IST)12 Jan 2019
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, मार्श माघारी

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मार्श मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी. मार्शच्या ५४ धावा

10:31 (IST)12 Jan 2019
शॉन मार्शचं अर्धशतक

ख्वाजा माघारी परतल्यानंतर शॉन मार्शने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं आहे

09:48 (IST)12 Jan 2019
ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश, ख्वाजा माघारी

रविंद्र जाडेजाने ख्वाजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. उस्मान ख्वाजाच्या ८१ चेंडूत ६ चौकारांसह ५९ धावा

09:39 (IST)12 Jan 2019
उस्मान ख्वाजाचं अर्धशतक

ख्वाजाने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत आपलं अर्धशतक साजरं केलं

09:38 (IST)12 Jan 2019
ख्वाजा - शॉन मार्श जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला

दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला आहे

08:37 (IST)12 Jan 2019
ऑस्ट्रेलियाचा दुसरा गडी माघारी

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कॅरीचा रोहित शर्माने घेतला झेल

08:05 (IST)12 Jan 2019
ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात, कर्णधार फिंच माघारी

भुवनेश्वर कुमारने उडवला फिंचचा त्रिफळा

07:42 (IST)12 Jan 2019
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

भारतीय संघात रविंद्र जाडेजा, कुलदीप यादवला भारतीय संघात स्थान

टॅग Ind Vs Aus

First Published on January 12, 2019 7:29 am

Web Title: india tour of australia 1st odi live updates