News Flash

अखेरच्या सामन्यात भारताची बाजी, मालिकेवरही 4-1 ने कब्जा

10 वर्षांनी भारताचा न्यूझीलंडमध्ये मालिका विजय

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाला 253 धावांचं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. अखेरचा वन-डे सामना 35 धावांनी जिंकत भारताने 5 वन-डे सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली आहे. तब्बल 10 वर्षांनी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडचा संघ 44.1 षटकात 217 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

भारताप्रमाणे न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मोहम्मद शमीने दोन्ही सलामीवीरांना ठराविक अंतराने माघारी धाडलं. यानंतर केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्यात रंगलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे सामना काहीकाळ अटीतटीचा होईल असं वाटतं होतं. मात्र लॅथम माघारी परतल्यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. जिमी निशमने झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडे पडले. भारताकडून युजवेंद्र चहलने 3, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 2-2 तर भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवने प्रत्येकी 1 बळी घेतला.

त्याआधी, अंबाती रायुडू, विजय शंकर, केदार जाधव आणि हार्दिक पांड्या या चार फलंदाजांनी मधल्या फळीत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात 252 धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. आघाडीच्या फळीतले 4 महत्वाचे फलंदाज अवघ्या 18 धावांत माघारी परतले. रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल हे फलंदाज आजच्या सामन्यातही अपयशी ठरले. दुखापतीनंतर संघात परतलेल्या धोनीलाही न्यूझीलंडने फारकाळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही.

यानंतर अंबाती रायुडूने विजय शंकरच्या साथीने भारताचा डाव सावरला. दोन्ही खेळाडूंनी संयमाने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा सामना करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. दोघांमध्येही पाचव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी झाली. चोरटी धाव घेण्याच्या नादात विजय शंकर धावबाद झाल्यानंतर रायुडूने केदार जाधवच्या साथीने खेळपट्टीवर जम बसवला. या दोन्ही खेळाडूंमध्येही सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी झाली. यानंतर हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत भारताला 250 धावांपर्यंत आणून सोडलं. पांड्याने 22 चेंडूत 45 धावा केल्या. यानंतर उर्वरित फलंदाज फारकाळ तग धरु शकले नाहीत. अखेरीस 1 चेंडू शिल्लक असताना भारताचा डाव 252 धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 4, ट्रेंट बोल्टने 3 तर जिमी निशमने 1 बळी घेतला. भारताचे 2 फलंदाज धावबाद झाले.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
 • 13:34 (IST)

  मराठमोळ्या केदारने फोडली न्यूझीलंडची जमलेली जोडी, कर्णधार विल्यमसन माघारी

  67 धावांच्या भागीदारीनंतर विल्यमसन केदार जाधवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी, शिखर धवनने घेतला झेल

  न्यूझीलंडचा चौथा गडी माघारी, विल्यमसनच्या 39 धावा

 • 13:32 (IST)

  न्यूझीलंडचा डाव सावरला, विल्यमसन-लॅथम जोडीची अर्धशतकी भागीदारी

  पहिले 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधार विल्यमसन आणि लॅथमने अर्धशतकी भागीदारी करत संघाला 100 धावांचा टप्पा पार करुन दिला

 • 12:31 (IST)

  भरवशाचा रॉस टेलर माघारी, न्यूझीलंडला तिसरा धक्का

  हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर रॉस टेलर माघारी

 • 10:54 (IST)

  हार्दिक पांड्याची फटकेबाजी

  अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्याचा न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर हल्लाबोल, 22 चेंडूत पांड्याच्या 45 धावा

 • 10:35 (IST)

  केदार जाधव त्रिफळाचीत, भारताला सातवा धक्का

  संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिल्यानंतर केदार जाधव मॅट हेन्रीच्या धिम्या चेंडूवर त्रिफळाचीत

 • 10:26 (IST)

  शतकापासून अवघ्या 10 धावा दूर असताना रायुडू माघारी, भारताला सहावा धक्का

  मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात रायुडू झेलबाद. रायुडूच्या 90 धावा

 • 09:39 (IST)

  चोरटी धाव घेण्याच्या नादात विजय शंकर धावबाद

  मोक्याच्या क्षणी भारताला आणखी एक धक्का देण्यात न्यूझीलंड यशस्वी, भारताचा निम्मा संघ माघारी

 • 09:35 (IST)

  रायुडू-शंकर जोडीने भारताचा डाव सावरला

  पाचव्या विकेटसाठी दोन्ही खेळाडूंनी भागीदारी रचत भारताला 100 धावांचा टप्पा गाठून दिला.

  दोघांमध्ये 98 धावांची भागीदारी

 • 08:15 (IST)

  भारताला चौथा धक्का, महेंद्रसिंह धोनी त्रिफळाचीत होऊन माघारी

  ट्रेंट बोल्टने उडवला धोनीचा त्रिफळा, भारताचा भरवशाचा खेळाडू माघारी

 • 07:55 (IST)

  भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा माघारी

  मॅट हेन्रीने उडवला रोहित शर्माचा त्रिफळा, भारतीय डावाची अडखळती सुरुवात

15:13 (IST)03 Feb 2019
न्यूझीलंडचा अखेरचा गडी माघारी, भारत सामन्यात विजयी

ट्रेंट बोल्ट भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर झेलबाद, भारत सामन्यात 35 धावांनी विजयी

मालिकेतली भारताची 4-1 ने बाजी, 10 वर्षांनी भारताचा न्यूझीलंडमध्ये मालिका विजय

15:00 (IST)03 Feb 2019
मिचेल सँटनर बाद, यजमानांचा नववा गडी माघारी

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर शमीने घेतला झेल

14:53 (IST)03 Feb 2019
टॉड अॅस्टल माघारी, न्यूझीलंडला आठवा धक्का

भारत विजयापासून 2 विकेट दूर, चहलने घेतला बळी

14:28 (IST)03 Feb 2019
न्यूझीलंडला सातवा धक्का, जिमी नीशम धावबाद

भारत विजयापासून तीन पावले दूर आहे. जिमी नीशम ४४ धावांवर धावबाद झाला आहे.  36.2  षटकांत न्यूझीलंडने सात गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या आहेत. 

13:58 (IST)03 Feb 2019
कॉलिन डी-ग्रँडहोम माघारी, न्यूझीलंडला सहावा धक्का

चहलच्या गोलंदाजीवर ग्रँडहोम पायचीत

13:45 (IST)03 Feb 2019
टॉम लॅथम माघारी, न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत

युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर लॅथम पायचीत

13:34 (IST)03 Feb 2019
मराठमोळ्या केदारने फोडली न्यूझीलंडची जमलेली जोडी, कर्णधार विल्यमसन माघारी

67 धावांच्या भागीदारीनंतर विल्यमसन केदार जाधवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी, शिखर धवनने घेतला झेल

न्यूझीलंडचा चौथा गडी माघारी, विल्यमसनच्या 39 धावा

13:32 (IST)03 Feb 2019
न्यूझीलंडचा डाव सावरला, विल्यमसन-लॅथम जोडीची अर्धशतकी भागीदारी

पहिले 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधार विल्यमसन आणि लॅथमने अर्धशतकी भागीदारी करत संघाला 100 धावांचा टप्पा पार करुन दिला

13:25 (IST)03 Feb 2019
न्यूझीलंडचे शतक, विल्यमसन-लॅथम जोडी जमली

झटपट तीन गडी गमावल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि लॅथम यांनी संघाला सावरले.  २४ व्या षटकांत न्यूझीलंडने आपलं शतक साजरे केले. 

12:31 (IST)03 Feb 2019
भरवशाचा रॉस टेलर माघारी, न्यूझीलंडला तिसरा धक्का

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर रॉस टेलर माघारी

12:27 (IST)03 Feb 2019
कॉलिन मुनरो त्रिफळाचीत, न्यूझीलंडला दुसरा धक्का

मोहम्मद शमीने उडवला मुनरोचा त्रिफळा, न्यूझीलंडचे सलामीवीर माघारी

12:00 (IST)03 Feb 2019
न्यूझीलंडला पहिला धक्का, हेन्री निकोसल माघारी

शमीच्या गोलंदाजीवर चौकार ठोकण्याचा प्रयत्न फसला, केदार जाधवने घेतला झेल

10:57 (IST)03 Feb 2019
भारताचा अखेरचा गडी धावबाद, 252 धावांवर डाव आटोपला

49.5 षटकात भारताची 252 धावांपर्यंत मजल, न्यूझीलंडला 253 धावांचं आव्हान. मोहम्मद शमी धावबाद

10:56 (IST)03 Feb 2019
भारताचा नववा गडी माघारी, भुवनेश्वर कुमार बाद

रॉस टेलरने घेतला भुवनेश्वर कुमारचा झेल

10:55 (IST)03 Feb 2019
भारताला आठवा धक्का, हार्दिक पांड्या माघारी

जिमी निशमच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या नादात हार्दिक पांड्या झेलबाद. ट्रेंट बोल्टने घेतला पांड्याचा झेल

10:54 (IST)03 Feb 2019
हार्दिक पांड्याची फटकेबाजी

अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्याचा न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर हल्लाबोल, 22 चेंडूत पांड्याच्या 45 धावा

10:35 (IST)03 Feb 2019
केदार जाधव त्रिफळाचीत, भारताला सातवा धक्का

संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिल्यानंतर केदार जाधव मॅट हेन्रीच्या धिम्या चेंडूवर त्रिफळाचीत

10:26 (IST)03 Feb 2019
शतकापासून अवघ्या 10 धावा दूर असताना रायुडू माघारी, भारताला सहावा धक्का

मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात रायुडू झेलबाद. रायुडूच्या 90 धावा

09:59 (IST)03 Feb 2019
अंबाती रायुडूचं अर्धशतक

विजय शंकर माघारी परतल्यानंतर रायुडूने एका बाजूने किल्ला लढवत आपलं अर्धशतक झळकावलं

09:39 (IST)03 Feb 2019
चोरटी धाव घेण्याच्या नादात विजय शंकर धावबाद

मोक्याच्या क्षणी भारताला आणखी एक धक्का देण्यात न्यूझीलंड यशस्वी, भारताचा निम्मा संघ माघारी

09:35 (IST)03 Feb 2019
रायुडू-शंकर जोडीने भारताचा डाव सावरला

पाचव्या विकेटसाठी दोन्ही खेळाडूंनी भागीदारी रचत भारताला 100 धावांचा टप्पा गाठून दिला.

दोघांमध्ये 98 धावांची भागीदारी

08:15 (IST)03 Feb 2019
भारताला चौथा धक्का, महेंद्रसिंह धोनी त्रिफळाचीत होऊन माघारी

ट्रेंट बोल्टने उडवला धोनीचा त्रिफळा, भारताचा भरवशाचा खेळाडू माघारी

08:01 (IST)03 Feb 2019
भारताला तिसरा धक्का, शुभमन गिल माघारी

सलग दुसऱ्या सामन्यात आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात गिल अपयशी ठरला आहे. मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर गिल झेलबाद होऊन तंबूत  परतला

07:56 (IST)03 Feb 2019
ठराविक अंतराने शिखर धवनही माघारी, भारताला दुसरा धक्का

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर शिखर धवन मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी

07:55 (IST)03 Feb 2019
भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा माघारी

मॅट हेन्रीने उडवला रोहित शर्माचा त्रिफळा, भारतीय डावाची अडखळती सुरुवात

07:54 (IST)03 Feb 2019
भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

महेंद्रसिंह धोनीचं संघात पुनरागमन, दिनेश कार्तिकला विश्रांती

टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 भारताच्या फलंदाजीला धोनीचा दिलासा
2 दमलेल्या खेळाडूंची कहाणी!
3 नागपूरच्या दिव्या देशमुखचा पराक्रम
Just Now!
X