फिरकीला पूर्णत: साथ देणाऱ्या चेपॉकच्या खेळपट्टीनं दुसऱ्या दवशी १५ फलंदाजांना बाद करीत आपले रंग दाखवले. सकाळी भारताचा पहिला डाव ३२९ धावासंख्येवर आटोल्यावर अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. ३४ वर्षीय अश्विनने कसोटी कारकीर्दीत २९ व्यांदा आणि मालिकेत दुसऱ्यांदा एका डावात पाच बळी घेण्याची किमया साधली. चेपॉकच्या खेळपट्टीवरुन दोन माजी खेळाडूंमध्ये ट्विटरवर चांगलीच झुंपली आहे.

दुसऱ्या दिवशीची खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला मदत देणारी असल्याचं दिसलं. दुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीवरुन इंग्लंड संघाचा माजी कर्णधान माइकल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न यांच्यात जुंपली आहे. वॉन यानं उपस्थित केलेल्या प्रश्नाचं शेन वॉर्न यानं उत्तर देत बोलती बंद केली आहे. मायकल वॉन यानं दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ट्विट करत म्हटलं की, ‘चेन्नईच्या खेळपट्टीने दुसरा कसोटीला रोमांचक बनवलं आहे, पण खेळपट्टी पाच दिवसाच्या सामन्यासाठी तयार केलेली नाही. क्रिकेट मनोरंजक आहे कारण सर्व वेळी गोष्टी घडत आहेत पण खरं सांगायला तर की ही पिच एक धक्कादायक आहे. भारत अधिक चांगला झाला आहे म्हणून कोणतेही सबब सांगत नाही परंतु ही खेळपट्टी कसोटी सामना पाच दिवसाची तयार केलेली नाही.’

Ind vs Eng Video: रोहित – पंत यांच्यात मैदानावर राडा? पाहा नक्की काय झालं…

मायकल वॉन यानं उपस्थित केलेल्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यानं ट्विट कर प्रत्त्युत्तर दिलं आहे. शेन वॉर्न याच्या उत्तरानं मायकल वॉनची बोलती बंद झाली आहे. शेन वॉर्न आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, ‘यापेक्षा पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे होतं, कारण पहिल्या दोन दिवसांत खेळपट्टीनं काहीही केले नाही. मग फुटली. ही पहिल्या चेंडूपासून वळण घेणारी बनली. इंग्लंडने भारताला अवध्या २२० धावांवर बाद केले पाहिजे होते. फिरकी किंवा सीम बॉलिंगमध्ये काही फरक नाही आणि रोहितने या खेळपट्टीवर कसे खेळायचे ते दाखवून दिले’

Ind vs Eng Video: कमनशिबी पुजारा! ‘अशा’ विचित्र पद्धतीने झाला बाद

शेन वॉर्न आणि मायकल वॉन यांच्यातील ट्विटरवॉर इथेच थांबला नाही. शेन वॉर्न यानं उत्तर दिल्यानंतर पुन्हा मायकल वॉन यानं त्वरित आपलं मत व्यक्त केलं. ट्विट करत मायकल वॉन म्हणाला, ‘दोन सत्राइतके कुठेही झालं नाही. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं चांगली फलंदाजी केली असती तर सामना वाचवू शकला असता. ही चांगली कसोटी सामन्याची खेळपट्टी नाही.’ वॉनच्या या ट्विटनंतर शेन वॉर्न यानं पुन्हा एकदा ट्विट केलं.

आणखी वाचा- IND vs ENG : पंत आणि धोनीची तुलना करणाऱ्यांना अश्विनचा सल्ला, म्हणाला…

शेन वॉर्न म्हणाला की, ‘बॉल सीमिंग/स्पिन करणे यात फरक नाही. आम्हाला नेहमीच बॅट/बॉल दरम्यान चांगली स्पर्धा हवी असते. या सामन्यात भारताने इंग्लंडपेक्षा चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजी केली. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास पहिल्या चेंडूपासून भारतीय संघानं सामन्यावर वर्चस्व राखलं आहे.’