25 February 2021

News Flash

“आयुष्यातील सर्वात गोड गिफ्ट”, टी नटराजनने शेअर केला मुलीसोबतचा गोंडस फोटो

मुलीच्या जन्मावेळी टी नटराजन भारतीय संघासाठी खेळत होता

(Photo: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा जलद गोलंदाज टी नटराजन याने आपल्या मुलीसोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. नटराजनची मुलगी नुकतीच चार महिन्यांची झाली असून इन्स्टाग्रामला फोटो शेअर करताना “Our little angel Hanvika” अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोत नटराजनसोबत त्याची पत्नीदेखील आहे.

पोस्ट शेअर करताना नटराजनने म्हटलं आहे की, “तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट आहे. आमच्या आयुष्यात आनंद असण्यामागे तू कारण आहेस. पालक म्हणून आमची निवड केल्याबद्दल तुझे आभार लाडू. खूप सारं प्रेम”.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्याने नटराजन मुलीच्या जन्मावेळी उपस्थित राहू शकला नव्हता. फक्त टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवड झालेल्या नटराजनला भारतीय संघातील दुखापतींमुळे एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

आयपीएलमधील जबरदस्त कामगिरीमुळे नटराजनची टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात नटराजनला पहिली संधी मिळाली. या सामन्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना १३ धावांनी जिंकला होता.

यानंतर टी-२० मधील पहिल्याच सामन्यात नटराजनने तीन विकेट्स घेतल्या होत्या. गाबा येथील ऐतिहासिक कसोटी विजयामध्ये नटराजननेही मोलाची कामगिरी केली. पहिल्या डावात नटराजनने ऑस्ट्रेलियाचे तीन गडी बाद केले होते. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत नटराजनची निवड झालेली नसून त्याला कुटुंबासोबत वेळ घालवता यावा यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र १२ मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:08 pm

Web Title: indian cricketer t natarajan shares photo with daughter sgy 87
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांत बदलांचे संकेत
2 करोनाचे भय किती काळ बाळगणार?
3 जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी महत्त्वाची!
Just Now!
X