News Flash

सायना उपांत्यपूर्व फेरीत

ज्वाला-अश्विनी, मनू-सुमीत जोडीचा पराभव

| June 3, 2016 03:32 am

२००९, २०१० आणि २०१२ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या सायनाची अंतिम आठमध्ये अव्वल मानांकित कॅरोलिन मारिनशी लढत होण्याची शक्यता आहे.

ज्वाला-अश्विनी, मनू-सुमीत जोडीचा पराभव
भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मात्र महिला दुहेरी प्रकारात ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा तसेच पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमीत रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात आले.
या स्पर्धेची तीन जेतेपदे नावावर असणाऱ्या सायनाने इंडोनेशियाच्या फितिरिआनी फितरिआनीवर २१-११, २१-१० असा विजय मिळवला. एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायनाने फितरिआनीवर मात केली होती. पहिल्या गेममध्ये सायनाने ९-७ अशी आघाडी घेतली. सलग सहा गुणांसह सायनाने ही आघाडी १४-७ अशी वाढवली. सातत्याने आघाडी वाढवत सायनाने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये झंझावाती खेळ करत सायनाने १०-३ अशी दमदार आघाडी घेतली. या आघाडीच्या बळावर सायनाने दुसऱ्या गेमसह सामना जिंकला.
चीनच्या ह्य़ुआंग याक्विआंग आणि तांग जिन्हुआ जोडीने ज्वाला-अश्विनी जोडीवर २१-९, २१-१८ अशी मात केली. कोरियाच्या को स्युंग ह्य़ुआन आणि शिन बेइक चेऑल जोडीने मनू आणि सुमीत जोडीवर २१-१८, २१-१३ असा विजय मिळवला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 3:32 am

Web Title: indonesia open saina nehwal sails to quarters
Next Stories
1 वर्णद्वेष फैलावणाऱ्या गटापुढे डेशॉम्पस् झुकले!
2 लिएण्डर पेस-सानिया मिर्झा समोरासमोर
3 शतकमहोत्सवी जेतेपदाच्या दावेदारीसाठी चुरस
Just Now!
X