News Flash

पावसामुळे सराव शर्यतींमध्ये व्यत्यय

शनिवारी मेलबर्नमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीआधी होणाऱ्या सराव शर्यती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता रविवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीआधीच सकाळी सराव शर्यती

| March 17, 2013 03:09 am

शनिवारी मेलबर्नमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीआधी होणाऱ्या सराव शर्यती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता रविवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीआधीच सकाळी सराव शर्यती घेतल्या जातील.
‘‘आकाशात काळे ढग दाटून आले होते. तसेच पाऊस थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळेच आम्ही सराव शर्यती रविवारी सकाळी घेण्याचा निर्णय घेतला. आमचा हा निर्णय योग्य म्हणावा लागेल. ढगाळ वातावरणात शर्यत घेणे शक्यच नव्हते. ड्रायव्हर्ससाठी ते धोक्याचे ठरले असते,’’ असे स्पर्धा संचालक चार्ली व्हायटिंग यांनी सांगितले. २०१०च्या जपान ग्रां. प्रि.नंतर प्रथमच सराव शर्यती आणि मुख्य शर्यत एकाच दिवशी होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 3:09 am

Web Title: interference of rain in practice race
टॅग : Grand Prix,Sports
Next Stories
1 विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची पाकिस्तानची धमकी
2 महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार
3 हेडनकडून कोहलीला क्षेत्ररक्षणाच्या टिप्स
Just Now!
X