भारत-पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांनी ही फायनल आधीची फायनल असल्याचे म्हटले आहे. विश्वचषक स्पर्धेत दोन्ही देशांमध्ये होणारा सामना हा अंतिम सामनाच असतो असे मत इंझमाम यांनी व्यक्त केले. सध्या ते पाकिस्तानी निवड समितीचे प्रमुख आहेत. वर्ल्ड कपमध्ये जेव्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने येतात तेव्हा ती फायनल आधीची फायनल असते.

दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना या लढतीची प्रचंड उत्सुक्ता असते. ज्या स्टेडिमयवर हा सामना होणार आहे. त्याची क्षमता २४ हजार आहे पण तिकीटांसाठी ८ लाख लोकांनी अर्ज केले होते. त्यावरुन हा सामना किती मोठा आहे त्याची कल्पना येते असे इंझमाम म्हणाले. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला आतापर्यंत एकदाही भारताचा पराभव करता आलेला नाही. दोन्ही संघ मैदानावर उतरतील तेव्हा आधी काय घडलं आहे ते महत्वाचं नसेल. तुम्ही त्यादिवशी कसा खेळ दाखवता त्यावर सर्व अवलंबून आहे असे इंझमाम यांनी सांगितले.

भारत-पाकिस्तान सामन्याच्यावेळी आधीची कामगिरी महत्वाची नसते. त्या दिवशी कोण चांगला खेळ दाखवणार ते महत्वाचे आहे. लोकांना चांगला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळेल. पाकिस्तान विजयी होईल अशी मला अपेक्षा आहे असे इंझमाम म्हणाले. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला आतापर्यंत एक सामना जिंकता आलेला आहे. टीमचे नशीब पालटेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वर्ल्डकप मध्ये पाकिस्तानला आतापर्यंत एकदाही भारताला नमवणे जमलेले नाही. त्यामुळे सहाजिक पाकिस्तानवर दबाव असेल. या मॅचकडे फक्त एक मॅच म्हणूनच पाहा एवढीच मी लोकांना विनंती करेन असे इंझमान उल हक म्हणाले. इंझमाम यांच्या मते भारताचा संघ संतुलित असून विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू आहे.