13 December 2017

News Flash

VIDEO: नितीश राणाच्या यशस्वी कामगिरीचे हरभजनने असे केले सेलिब्रेशन

हरभजनने यावेळी धम्माल उडवून दिली

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: April 21, 2017 9:18 PM

नितीश राणाने केक कापून मुंबई इंडियन्साच्या विजयाचा आनंद लुटला

मुंबई इंडियन्ससाठी युवा क्रिकेटपटू नितीश राणा सध्या दमदार कामगिरी करत आहे. सातत्यूपर्ण कामगिरीच्या जोरावर नितीश राणा यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यातही त्याने अर्धशतकी कामगिरी करून ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. मुंबई इंडियन्सने हा सामना ८ विकेट्स राखून दिमाखात जिंकला. मुंबईचा हा सलग पाचवा विजय ठरला.

सामना संपल्यानंतर हॉटेलमध्ये नितीश राणाच्या कामगिरीसाठी केक मागविण्यात आला होता. नितीश राणाने केक कापून मुंबई इंडियन्साच्या विजयाचा आणि संपूर्ण संघाने नितीश राणाला ऑरेंज कॅप मिळाल्याचे सेलिब्रेशन केले. हरभजनने यावेळी धम्माल उडवून देत नितीश राणाला केक नुसता खाऊ घातला नाही, तर त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर केक फासला. नितीश राणाने केक कापल्याच्या काही सेकंदात हरभजन मागून आला आणि त्याने केकचा मोठा तुकडा घेऊन राणाचा चेहराच केकने रंगवून टाकला. मग पुढे हार्दिक पंड्याने हरभजनला हातभार लावत नितीश राणाचे अभिनंदन केले. पंड्याने शॅम्पेन फोडूनही सेलिब्रेशन केले.
मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात १९९ धावांचे आव्हान अगदी सहज गाठले होते. जोस बटलरने यावेळी ७७ धावांची खेळी साकारली होती, तर नितीश राणाने ३८ चेंडूत नाबाद ६२ धावा ठोकल्या होत्या.

First Published on April 21, 2017 9:16 pm

Web Title: ipl 2017 watch how nitish rana success celebration cake smash