आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा संघ सलग सहा सामने हरला. त्याआधी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेन्टी २० आणि एकदिवसीय मालिकेतदेखील पराभूत झाला. त्या पाश्र्वभूमीवर विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असले तरी आयपीएलच्या कामगिरीवरून विराट कोहलीचे मूल्यमापन करू नये, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आणि संघ निवडसमितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.

इंडियन प्रीमियर लीगशी कोणत्याही प्रकारे संबंध नसला तरी यांना आयपीएल बघायला आवडते. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या आंद्रे रसेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध १३ चेंडूंत घणाघाती ४८ धावा करीत विजयश्री खेचून आणली. ती तुफान कत्तल करणारी खेळी सुरू असताना कोहली हा हतबल दिसला, मात्र तेवढय़ा कारणावरून त्याचे मूल्यमापन करणे योग्य नव्हे, असे वेंगसरकर यांनी म्हटले आहे. ‘‘विराट हा सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक आहे. तसेच तो चांगल्या लयीतदेखील आहे. त्याला जर योग्य पाठबळ मिळाले तर तो कर्णधार म्हणूनदेखील चांगली कामगिरी बजावतो. मात्र, त्यासाठी त्याच्यावर विश्वास दाखवावा लागेल.

विश्वचषकात भारत नेहमीप्रमाणे एक मजबूत दावेदार म्हणून उतरणार आहे. त्यामुळे कोहलीच्या कामगिरीकडे सगळ्यांचेच लक्ष राहणार आहे. भारताकडे गोलंदाजांची मजबूत फळी असून ते भारताचे बलस्थान राहणार आहे,’’ असे वेंगसरकर म्हणाले.

दरम्यान, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) च्या ४० जवानांना हौतात्म्य स्विकारावं लागलं. या हल्ल्यानंतर देशभरात सर्वत्र संतापाची लाट पसरली होती. या घटनेनंतर भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानशी खेळू नये, असा सूर भारतीयांमध्ये उमटलेला दिसला. भारत सरकार जो निर्णय देईल, त्यानुसार सामन्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे BCCI ने स्पष्ट केले. पण अद्याप भारत पाकिस्तानशी सामना खेळणार की नाही, याबाबत BCCI ने काही संकेत दिलेले नाहीत.

२०१९ विश्वचषकाचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ जून

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ९ जून

भारत विरुद्ध न्यूझीलंड – १३ जून

भारत विरुद्ध पाकिस्तान – १६ जून

भारत विरुद्ध अफगाणिस्तान – २२ जून

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – २७ जून

भारत विरुद्ध इंग्लंड – ३० जून

भारत विरुद्ध बांगलादेश – २ जुलै

भारत विरुद्ध श्रीलंका – ६ जुलै