News Flash

IPL 2019 KKR vs DC : दिल्लीचा ‘गब्बर’ विजय; कोलकातावर ७ गडी राखून मात

शिखर धवनच्या नाबाद ९७ धावा

शिखर धवन

IPL 2019 KKR vs DC Live Updates : कोलकाताच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकातावर ७ गडी राखून मोठा विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने १७९ धावांचे आव्हान ७ चेंडू राखून पूर्ण केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १७८ धावा केल्या होत्या. मात्र त्यांच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही.

१७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीने १४ धावा केल्या. त्यात २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. केवळ ६ धावा करून तो माघारी परतला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. शिखर धवनच्या साथीने खेळत ऋषभ पंतने दमदार फटकेबाजी केली. पण अर्धशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो ४६ धावा करून बाद झाला. पण शिखर धवन ९७ धावा करून नाबाद राहिला. त्याने ११ चौकार आणि २ षटकार खेचले. तर कॉलिन इन्ग्रॅमने (१४*) विजयी षटकार लगावला.

त्या आधी, कोलकाताकडून सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळालेला जो डेण्टली पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. इशांत शर्माने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करत त्याला माघारी धाडले. किमो पॉल याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या ‘फ्री हिट’वर षटकार लगावत कोलकाताने अर्धशतकी मजल मारली. रॉबिन उथप्पाने अचूक फटका खेळत ‘फ्री हिट’चा उपयोग केला. धडाकेबाज सुरुवात मिळालेला रॉबिन उथप्पा उसळत्या चेंडूवर फटका लगावताना झेलबाद झाला. यष्टिरक्षकाने उंच उडी मारून त्याचा अप्रतिम झेल टिपला. उथप्पाने ४ चौकार आणि १ षटकार लगावत ३० चेंडूत २८ धावा केल्या. शुभमन गिल याने अप्रतिम खेळी साकारत दमदार अर्धशतक झळकावले. पण कोलकाताच्या संघाला तो आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातच नितीश राणा त्रिफळाचीत झाला आणि कोलकाताचा तिसरा गडी माघारी परतला. राणाने १२ चेंडूत ११ धावा केल्या. अर्धशतक पूर्ण केल्यावर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल झेलबाद झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला. गिलने ३९ चेंडूत दमदार ६५ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते. कर्णधार दिनेश कार्तिक २ धावांवर बाद झाला आणि कोलकाताला पाचवा धक्का बसला. आंद्रे रसलने नेहमीप्रमाणे फटकेबाजी करत ४५ धावा केल्या. यात ३ चौकार आणि २ षटकार खेचले. क्रेग ब्रेथवेट ६ धावांवर बाद झाला.शेवटच्या टप्प्यात पियुष चावलाच्या ६ चेंडूत १४ धावांच्या जोरावर कोलकाताने १७८ धावांपर्यंत मजल मारली.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
 • 23:49 (IST)

  दिल्लीचा ‘गब्बर’ विजय; कोलकातावर ७ गडी राखून मात

  कोलकाताच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकातावर ७ गडी राखून मोठा विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने १७९ धावांचे आव्हान ७ चेंडू राखून पूर्ण केले. 

 • 22:14 (IST)

  शुभमन गिलचे अर्धशतक; दिल्लीला १७९ धावांचे आव्हान

  कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १७८ धावा केल्या. शुभमन गिलचे अर्धशतक (६५) आणि आंद्रे रसलची फटकेबाजी (४५) यांच्या जोरावर कोलकाताने दिल्लीपुढे १७९ धावांचे आव्हान दिले.

 • 19:40 (IST)

  नाणेफेक जिंकून दिल्लीची प्रथम गोलंदाजी

  नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. IPL २०१९ मध्ये या आधी सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरच्या माध्यमातून लागला होता. दिल्लीने तो सामना जिंकला होता. त्यामुळे कोलकाता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानावर आहे.

23:49 (IST)12 Apr 2019
दिल्लीचा ‘गब्बर’ विजय; कोलकातावर ७ गडी राखून मात

कोलकाताच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकातावर ७ गडी राखून मोठा विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने १७९ धावांचे आव्हान ७ चेंडू राखून पूर्ण केले. 

23:29 (IST)12 Apr 2019
ऋषभ पंत झेलबाद; दिल्लीला तिसरा धक्का

शिखर धवनच्या साथीने खेळत ऋषभ पंतने दमदार फटकेबाजी केली. पण अर्धशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो ४६ धावा करून बाद झाला.

22:51 (IST)12 Apr 2019
शिखर धवनचे झंझावाती अर्धशतक

कोलकाताचे पहिले दोन गडी झटपट बाद झाले, पण सलामीवीर शिखर धवनने फटकेबाजी करत झंझावाती अर्धशतक पूर्ण केले.

22:29 (IST)12 Apr 2019
कर्णधार श्रेयस अय्यर बाद; दिल्लीला दुसरा धक्का

कर्णधार श्रेयस अय्यरने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. केवळ ६ धावा करून तो माघारी परतला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला.

22:17 (IST)12 Apr 2019
पृथ्वी शॉ झेलबाद; दिल्लीला पहिला धक्का

१७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीने १४ धावा केल्या. त्यात २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

22:14 (IST)12 Apr 2019
शुभमन गिलचे अर्धशतक; दिल्लीला १७९ धावांचे आव्हान

कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १७८ धावा केल्या. शुभमन गिलचे अर्धशतक (६५) आणि आंद्रे रसलची फटकेबाजी (४५) यांच्या जोरावर कोलकाताने दिल्लीपुढे १७९ धावांचे आव्हान दिले.

21:41 (IST)12 Apr 2019
ब्रेथवेट झेलबाद; कोलकाताला सातवा धक्का

क्रेग ब्रेथवेट ६ धावांवर बाद झाला.

21:35 (IST)12 Apr 2019
रसल ४५ धावांवर माघारी; कोलकाताला सहावा धक्का

आंद्रे रसलने नेहमीप्रमाणे फटकेबाजी करत ४५ धावा केल्या. यात ३ चौकार आणि २ षटकार खेचले.

21:16 (IST)12 Apr 2019
कर्णधार कार्तिक बाद; कोलकाताला पाचवा धक्का

कर्णधार दिनेश कार्तिक २ धावांवर बाद झाला आणि कोलकाताला पाचवा धक्का बसला.

21:13 (IST)12 Apr 2019
शुभमन गिल बाद; कोलकाताला चौथा धक्का

अर्धशतक पूर्ण केल्यावर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल झेलबाद झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला. गिलने ३९ चेंडूत दमदार ६५ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते.

21:02 (IST)12 Apr 2019
शुभमनचे अर्धशतक, राणा त्रिफळाचीत; कोलकाताचे ३ गडी माघारी

शुभमन गिल याने अप्रतिम खेळी साकारत दमदार अर्धशतक झळकावले. पण कोलकाताच्या संघाला तो आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातच नितीश राणा त्रिफळाचीत झाला आणि कोलकाताचा तिसरा गडी माघारी परतला. राणाने १२ चेंडूत ११ धावा केल्या.

20:38 (IST)12 Apr 2019
रॉबिन उथप्पा झेलबाद; कोलकाताला दुसरा धक्का

धडाकेबाज सुरुवात मिळालला रॉबिन उथप्पा उसळत्या चेंडूवर फटका लगावताना झेलबाद झाला. यष्टिरक्षकाने उंच उडी मारून त्याचा अप्रतिम झेल टिपला. उथप्पाने ४ चौकार आणि १ षटकार लगावत ३० चेंडूत २८ धावा केल्या.

20:31 (IST)12 Apr 2019
फ्री हिट वर षटकार; कोलकाताचे दमदार अर्धशतक

किमो पॉल याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या 'फ्री हिट'वर षटकार लगावत कोलकाताने अर्धशतकी मजल मारली. रॉबिन उथप्पाने अचूक फटका खेळत 'फ्री हिट'चा उपयोग केला.

20:02 (IST)12 Apr 2019
पहिल्या चेंडूवर डेण्टली त्रिफळाचीत; कोलकाताला पहिला धक्का

कोलकाताकडून सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळालेला जो डेण्टली पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. इशांत शर्माने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करत त्याला माघारी धाडले.

19:40 (IST)12 Apr 2019
नाणेफेक जिंकून दिल्लीची प्रथम गोलंदाजी

नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. IPL २०१९ मध्ये या आधी सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरच्या माध्यमातून लागला होता. दिल्लीने तो सामना जिंकला होता. त्यामुळे कोलकाता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानावर आहे.

टॅग : IPL 2019
Next Stories
1 IPL 2019 : ” …म्हणून धोनीने मैदानावर जाऊन घातला राडा ” ; CSK कडून स्पष्टीकरण
2 IPL 2019 : RCB च्या ताफ्यात धडाडणार ‘स्टेन’गन
3 Video : जेव्हा राजस्थानचा चाहता अचानक चेन्नईला पाठिंबा देतो…
Just Now!
X