सलामीवीर लोकेश राहुलचं अर्धशतक आणि त्याला निकोलस पूरन, ख्रिस गेल यांनी छोटेखानी खेळी करत दिलेल्या साथीच्या जोरावर पंजाबने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जवर पंजाबने ६ गडी राखून मात केली. पंजाबचं या स्पर्धेतं आव्हान संपुष्टात आलेलं होतं. मात्र चेन्नईला गुणतालिकेत खाली खेचण्यासाठी त्यांना १४.३ षटकांच्या आत दिलेलं लक्ष्य पूर्ण करायचं होतं. मात्र यामध्ये त्यांना अपयश आलं. परंतु चेन्नईच्या गोलंदाजीचा समाचार घेत पंजाबने आपल्या पर्वाचा अखेर विजयाने केला. लोकेश राहुलने ७१ धावांची खेळी केली.

लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. राहुलने चेन्नईच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. हरभजन सिंहने आपल्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर राहुल आणि गेलला माघारी धाडलं. मात्र पंजाबच्या इतर फलंदाजांनी आपल्या संघाचं आव्हान कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केलं. चेन्नईकडून हरभजन सिंहने ३ तर रविंद्र जाडेजाने १ बळी घेतला.

त्याआधी, सलामीवीर फाफ डु प्लेसिसची तुफान ९६ धावांची खेळी आणि त्याला रैनाच्या अर्धशतकी खेळीची साथ या बळावर चेन्नईने पंजाबला १७१ धावांचे आव्हान दिले. डावखुऱ्या सॅम करनने शेन वॉटसनचा त्रिफळा उडवला आणि चेन्नईला डावाच्या सुरुवातीलाच पहिला धक्का दिला. मात्र, चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने संयमी खेळी करत दमदार अर्धशतक ठोकले. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने ३७ चेंडू घेतले. डु प्लेसिस पाठोपाठ सुरेश रैनानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३४ चेंडूत ही कामगिरी केली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रैना बाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावत ३८ चेंडूत ५३ धावा केल्या. तुफान फलंदाजी करणारा सलामीवीर डु प्लेसिस याचं शतक केवळ ४ धावांनी हुकलं. त्याने ५५ चेंडूत ९६ धावांची झंजावाती खेळी केली. या खेळीमध्ये त्याने १० चौकार आणि ४ षटकार लगावले.

यानंतर, अंबाती रायडू केवळ १ धाव करून माघारी परतला. मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. केदार जाधवला पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले. त्यामुळे चेन्नईला २० षटकात ५ बाद १७० धावापर्यंत मजल मारता आली.

Live Blog

19:02 (IST)05 May 2019
मयांक अग्रवाल माघारी, पंजाबला तिसरा धक्का

हरभजन सिंहला मिळाला सामन्यात तिसरा बळी

निकोलस पूरन रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर माघारी, पंजाबचा चौथा गडी माघारी

18:55 (IST)05 May 2019
हरभजनच्या एकाच षटकात पंजाबचे सलामीवीर माघारी

लोकेश राहुल, ख्रिस गेल माघारी

लोकेश राहुलची ७१ धावांची खेळी

18:18 (IST)05 May 2019
पंजाबची आक्रमक सुरुवात, पाचव्या षटकात झळकावलं अर्धशतक

सलामीवीर लोकेश राहुलने चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत १९ चेंडूत अर्धशतक झळकावलं

17:53 (IST)05 May 2019
चेन्नईला गुणतालिकेत अव्वल राहण्यासाठी 'हे' महत्वाचे

सध्या गुणतालिकेत दिल्ली आणि चेन्नई यांचे समान १८ गुण आहेत. जर चेन्नईला गुणतालिकेत अव्वल रहायचे असेल, तर चेन्नईला पंजाबच्या संघाला केवळ पराभूतच करणे पुरेसे नाही, तर किमान १४ षटके आणि ३ चेंडू खेळवावी लागतील.

17:41 (IST)05 May 2019
डु प्लेसिसची फटकेबाजी; पंजाबला १७१ धावांचे लक्ष्य

डु प्लेसिसची फटकेबाजी; पंजाबला १७१ धावांचे लक्ष्य

17:36 (IST)05 May 2019
केदार जाधव त्रिफळाचीत

केदार जाधवला पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले.

17:34 (IST)05 May 2019
रायडू १ धाव करून माघारी

अंबाती रायडू केवळ १ धाव करून माघारी परतला. मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला.

17:30 (IST)05 May 2019
डु प्लेसिसचं शतक हुकलं; चेन्नईला तिसरा धक्का

तुफान फलंदाजी करणारा सलामीवीर डु प्लेसिस याचं शतक केवळ ४ धावांनी हुकलं. त्याने ५५ चेंडूत ९६ धावांची झंजावाती खेळी केली. या खेळीमध्ये त्याने १० चौकार आणि ४ षटकार लगावले.

17:21 (IST)05 May 2019
अर्धशतकानंतर रैना बाद; चेन्नईला दुसरा धक्का

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रैना बाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावत ३८ चेंडूत ५३ धावा केल्या.

17:09 (IST)05 May 2019
रैनाचे अर्धशतक; चेन्नई भक्कम स्थितीत

डु प्लेसिस पाठोपाठ सुरेश रैनानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३४ चेंडूत ही कामगिरी केली.

16:59 (IST)05 May 2019
फाफ डु प्लेसिसचे दमदार अर्धशतक

चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने संयमी खेळी करत दमदार अर्धशतक ठोकले. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने ३७ चेंडू घेतले.

16:22 (IST)05 May 2019
करनने उडवला वॉटसनचा त्रिफळा; चेन्नईला पहिला धक्का

डावखुऱ्या सॅम करनने शेन वॉटसनचा त्रिफळा उडवला आणि चेन्नईला डावाच्या सुरुवातीलाच पहिला धक्का दिला. त्याने ७ धावा केल्या.

15:46 (IST)05 May 2019
नाणेफेक जिंकून पंजाबची प्रथम गोलंदाजी

पंजाबने संघात एकमेव बदल केला आहे. हरप्रीत ब्रार याला संघात स्थान देण्यात आले असून अर्षदिप सिंगला वगळण्यात आले.