IPL 2019 SRH vs CSK Updates : डेव्हिड वॉर्नर (५०) आणि जॉनी बेअरस्टो (६१*) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने चेन्नईवर ६ गडी राखून मात केली. फिरकीपटू रशीद खानची प्रभावी फिरकी आणि त्याला गोलंदाजांची मिळलेली उत्तम साथ याच्या बळावर हैदराबादने चेन्नईला २० षटकात ५ बाद १३२ धावांत रोखले आणि हैदराबादला १३३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादने १९ चेंडू राखून पूर्ण केले.

१३३ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली आणि हैदराबादला अर्धशतकी सलामी दिली. पण अर्धशतक पूर्ण केल्यावर वॉर्नर बाद झाला आणि हैदराबादला पहिला धक्का बसला. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन ताहिरच्या फिरकीवर झेलबाद झाला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. त्याने केवळ ३ धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर स्वस्तात झेलबाद झाला आणि हैदराबादला तिसरा धक्का बसला. तो केवळ ७ धावांवर माघारी परतला. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने मात्र संयमी खेळी करत ३९ चेंडूत अर्धशतक ठोकले, तो ६१ धावांवर नाबाद राहिला.

त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने डावाला धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर वॉटसन आणि डु प्लेसिस यांनी चेन्नईला सातव्या षटकात अर्धशतकी सलामी मिळवून दिली. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर चेन्नईचा सलामीवीर वॉटसन त्रिफळाचीत झाला. ४ चौकारांसह ३१ धावा करून तो माघारी परतला. अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेला डु प्लेसिसदेखील उसळत्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार खेचत ४५ धावा केल्या.

त्यानंतर धोनीच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपद भुषवणारा सुरेश रैना मैदानावर आला. तो खेळपट्टीवर जम बसवणार इतक्याच तो पायचीत झाला. त्याने १३ चेंडूत १३ धावा केल्या. पाठोपाठ केदार जाधवदेखील पायचीत झाला. त्याला केवळ १ धाव जमवता आली. विशेष म्हणजे या दोनही विकेटच्या वेळी मैदानावरील पंचांनी फलंदाजाला बाद ठरवले. त्यामुळे CSK ने DRS ची मदत घेतली, पण दोनही वेळा रिव्ह्यूमध्ये त्यांना मैदानावरील पंचांचा निर्णय मान्य करावा लागला. त्यानंतर परदेशी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आलेला सॅम बिलिंग्स आपली छाप उमटवू शकला नाही. तो भोपळाही न फोडता माघारी परतला. अखेर अंबाती रायडू आणि रवींद्र जाडेजा यांच्यामुळे चेन्नईला १३२ धावांपर्यंत मजल मारता आली.

Live Blog

23:29 (IST)17 Apr 2019
वॉर्नर, बेअरस्टोची अर्धशतके; हैदराबादची चेन्नईवर ६ गडी राखून मात

डेव्हिड वॉर्नर (५०) आणि जॉनी बेअरस्टो (६१*) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने चेन्नईला ६ गडी राखून मात केली. 

23:07 (IST)17 Apr 2019
सलामीवीर जॉनी बेअरस्टोचे संयमी अर्धशतक

सलामीवीर जॉनी बेअरस्टोने मात्र संयमी खेळी करत ३९ चेंडूत अर्धशतक ठोकले, तो ६२ धावांवर नाबाद राहिला.

22:58 (IST)17 Apr 2019
विजय शंकर झेलबाद; हैदराबादला तिसरा धक्का

अष्टपैलू खेळाडू विजय शंकर स्वस्तात झेलबाद झाला आणि हैदराबादला तिसरा धक्का बसला. तो केवळ ७ धावांवर माघारी परतला.

22:38 (IST)17 Apr 2019
कर्णधार विल्यमसन बाद; हैदराबादला दुसरा धक्का

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन ताहिरच्या फिरकीवर झेलबाद झाला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. त्याने केवळ ३ धावा केल्या.

22:34 (IST)17 Apr 2019
अर्धशतकी सलामीनंतर हैदराबादला पहिला धक्का

१३३ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली आणि हैदराबादला अर्धशतकी सलामी दिली. पण अर्धशतक पूर्ण केल्यावर वॉर्नर बाद झाला आणि हैदराबादला पहिला धक्का बसला.

21:51 (IST)17 Apr 2019
रशीदने घेतली चेन्नईची 'फिरकी'; हैदराबादला १३३ धावांचे लक्ष्य

फिरकीपटू रशीद खानची प्रभावी फिरकी आणि त्याला गोलंदाजांची मिळलेली उत्तम साथ याच्या बळावर हैदराबादने चेन्नईला २० षटकात ५ बाद १३२ धावांत रोखले आणि चेन्नईला १३३ धावांचे आव्हान दिले.

21:15 (IST)17 Apr 2019
सॅम बिलिंग्स बाद; चेन्नईचा निम्मा संघ माघारी

परदेशी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आलेला सॅम बिलिंग्स आपली छाप उमटवू शकला नाही. तो भोपळाही न फोडता माघारी परतला.

21:03 (IST)17 Apr 2019
कर्णधार रैना, केदार बाद; चेन्नईचे ४ गडी माघारी

धोनीच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपद भुषवणारा सुरेश रैना पायचीत झाला. त्याने १३ चेंडूत १३ धावा केल्या. पाठोपाठ केदार जाधवदेखील पायचीत झाला. त्याला केवळ १ धाव जमवता आली. विशेष म्हणजे या दोनही विकेटच्या वेळी मैदानावरील पंचांनी फलंदाजाला बाद ठरवले. त्यामुळे CSK ने DRS ची मदत घेतली, पण दोनही वेळा रिव्ह्यूमध्ये त्यांना मैदानावरील पंचांचा निर्णय मान्य करावा लागला.

20:50 (IST)17 Apr 2019
डु प्लेसिस झेलबाद; चेन्नईला दुसरा धक्का

अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेला डु प्लेसिस उसळत्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार खेचत ४५ धावा केल्या.

20:47 (IST)17 Apr 2019
वॉटसन त्रिफळाचीत; चेन्नईला पहिला धक्का

चांगली सुरुवात मिळाल्यानंतर चेन्नईचा सलामीवीर वॉटसन त्रिफळाचीत झाला. ४ चौकारांसह ३१ धावा करून तो माघारी परतला.

20:32 (IST)17 Apr 2019
चेन्नईची धडाकेबाज सुरुवात; दिली अर्धशतकी सलामी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने डावाला धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर वॉटसन आणि डु प्लेसिस यांनी चेन्नईला सातव्या षटकात अर्धशतकी सलामी मिळवून दिली.

19:40 (IST)17 Apr 2019
नाणेफेक जिंकून चेन्नईची प्रथम फलंदाजी

नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार सुरेश रैना याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आज चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा सुरेश रैना याच्याकडे सोपवण्यात आली आहे.