२०१९ आयपीएलच्या हंगामाचं उप-विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने आणखी एका खेळाडूला संघातून करारमुक्त केलं आहे. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्जला चेन्नईने निरोप दिला आहे. त्यामुळे आगामी हंगामासाठी बिलिंग्जला लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं लागणार आहे.
२०१८ साली चेन्नईने बिलिंग्जला १ कोटी रुपयांची किंमत मोजून चेन्नईसाठी करारबद्ध केलं होतं. यानंतर बिलिंग्जने चेन्नईसाठी १० सामने खेळले, ज्यात त्याने १०८ धावा केल्य़ा. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बिलिंग्जने चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
काही प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सचा संघ बिलिंग्जला आपल्या संघात सहभागी करुन घेण्यासाठी उत्सुक आहे. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव पार पडणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 14, 2019 4:21 pm