IPL 2020 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत पंजाबच्या संघाने धमाकेदार खेळ करून दाखवला. पंजाबचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार कामगिरी करत आपली छाप उमटवली. पण शेवटच्या टप्प्यात केलेल्या चुकांमुळे त्यांना गुणतक्त्यात सहाव्या स्थानी समाधान मानांव लागलं. आता यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणारे नवे चेहरे घेण्याचा विचार पंजाबची संघमालक प्रिती झिंटा आणि संघ व्यवस्थापनाचा आहे. त्यामुळे गेल्या वर्षी अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलसह काही बड्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

करारमुक्त केलेले खेळाडू

ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्डस विल्जॉएन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉट्रेल, जिमी नीशम, कृष्णाप्पा गौथम, तजिंदर सिंह

कायम राखलेले खेळाडू

के एल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसिमरन सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल